MNS News : 'जेव्हा राज ठाकरे शांत असतात, तेव्हा...' ; मनसे नेते प्रकाश महाजन यांचं विधान!

Prakash Mahajan On Raj Thackeray : यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Prakash Mahajan
Prakash MahajanSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार आहे. परंतु यंदाच्या मेळाव्याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यामधून मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे.

मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची महायुतीशी वाढलेली जवळीक आणि विशेष म्हणजे दिल्ली दौरा करून गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतली, या घडामोडी पाहता राज ठाकरे नेमका काय निर्णय जाहीर करतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

Prakash Mahajan
Mangaldas Bandal News : फडणवीसांची भेट घेणं मंगलदास बांदल यांना भोवलं; 'वंचित'कडून शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी बैठक आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. तर अद्यापही काही जागा आहेत, जिथे एकमत होताना दिसत नाही. एवढच नाहीतर जाहीर झालेल्या उमेदवाराबाबतही नाराजी व्यक्त होत असून, काही जागांवर उमेदवारही बदलले गेले आहेत. एकूणच सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे(Raj Thackeray) मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून भाष्य करू शकतात.

राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मनसे आणि राज ठाकरे शांत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी(Prakash Mahajan) एक विधान केलं आहे. 'राज ठाकरे जेव्हा शांत असतात तेव्हा ते जास्त चिंतन करत असतात. आम्ही शांत नाही, मात्र निवडणुकीबाबत गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे निर्णय जाहीर करतील.

Prakash Mahajan
Shrikant Shinde News : "वाघ म्हणून फिरणारे अन् मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे कुठे आहेत?" श्रीकांत शिंदेंचा सवाल

याशिवाय, जनतेमध्ये संभ्रम नाही, प्रसार माध्यमांमध्ये संभ्रम आहे. आम्ही सर्वत्र फिरतो आहोत. यंदाची निवडणूक फार किचकट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे राज ठाकरे याबाबत चिंतन करत आहेत, असं प्रकाश महाजन म्हणाले. तसेच, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यातील बैठक ही उच्च पातळीवरील होती, त्यामुळे आम्हाला याबाबत अधिक महिती नाही. परंतु सकारात्मक चर्चा झाली असणार योग्यवेळी याबाबत माहिती समोर येईल, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com