Shrikant Shinde News : "वाघ म्हणून फिरणारे अन् मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे कुठे आहेत?" श्रीकांत शिंदेंचा सवाल

Shrikant Shinde On Ganpat Gaikwad : श्रीकांत शिंदे यांचं काम न करण्याची भूमिका आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यावरून शिंदे यांनी गायकवाडांच्या कार्यकर्त्यांना बजावलं आहे.
aaditya thackeray shrikant shinde
aaditya thackeray shrikant shindesarkarnama
Published on
Updated on

आम्ही कल्याणमधून निवडणूक लढू म्हणत मोठे-मोठे वाघ फिरत होते. कुठल्या नेत्यांची नावे घेण्यात आली. पण, मोठ मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ), वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी ठाकरेंवर केली आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी ( 6 एप्रिल ) अंबरनाथ येथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्ही कल्याणमधून निवडणूक लढू म्हणत मोठ मोठे वाघ फिरत होते. कुठल्या नेत्यांची नावे घेण्यात आली. पण, मोठ मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ), वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याला पुढं करून 'तुम लढो हम कपडा सांभालते है' अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. पहिल्यापासूनच त्यांचे हे धोरण राहिले आहे," असा हल्लाबोल श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर केला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचं काम न करण्याची भूमिका घेतली आहे. यावरून श्रीकांत शिंदेंनी आमदार गायकवाड यांच्या समर्थकांना सुनावलं आहे.

aaditya thackeray shrikant shinde
Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ फडणवीसच करणार, बहुमताने निवडून आणणार

"गोळीबार मी करायला लावला नाही. ज्यांनी केला ते शिक्षा भोगत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान वातावरण खराब करण्याचं काम कोणी करत असतील, तर मला वाटतं ते भाजपचे पदाधिकारी नसतील. पण, भाजपचे पदाधिकारी असतील, तर वरिष्ठांनी त्यांना समज दिली पाहिजे. स्वत:च्या अजेंड्यासाठी सगळ्या गोष्टी होत असतील, तर वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे," असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.

( Edited By : Akshay Sabale )

R

aaditya thackeray shrikant shinde
Lok Sabha Election: कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने..., श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसची बोचरी टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com