Prashant Bamb News : गंगापूर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बंब-ठाकरे गटात चुरस..

Marathwada : २००८ पासून बंद असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Mla Prashant Bamb-Krishna Patil Dongaonkar News, Aurangabad
Mla Prashant Bamb-Krishna Patil Dongaonkar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेला आणि बॅंकेने कर्जवसुलीसाठी भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १२ फेब्रुवारीला यासाठी मतदान होणार आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील हा कारखाना असून या कारखान्यावरून मध्यंतरी बरेच राजकारण घडले होते.

Mla Prashant Bamb-Krishna Patil Dongaonkar News, Aurangabad
Ncp News : औरंगजेब, मुघल शासकांनी बांधलेल्या वास्तुंचा जिर्णोधार करा, राष्ट्रवादीची मागणी..

बंब (Prashant Bamb) यांच्यावर ठाकरे गटाचे कृष्णापाटील डोणगांवकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोट्यावधींचा कारखाना कवडीमोल भावात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या कंपनीला हा कारखाना चालवयाला दिल्याचा आरोप बंब यांनी विधानसभेच्या सभागृहात केला होता. (Aurangabad) तेव्हापासून या कारखान्याची राज्यात चर्चा होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २१ पैकी १ संचालक बिनविरोध निवडून आला आहे.

आता २० संचालकांसाठी १२ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आमदार प्रशांत बंब व ठाकरे गटाची या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. २० जागांसाठी आता ४० उमेदवार रिंगणात असून सोसायटी मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष संजय जाधव बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रशांत बंब व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. २००८ पासून बंद असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सर्वसाधारण मतदारसंघात ३०, महिला मतदारसंघात ४, अनुसूचित जाती, जनजाती मतदारसंघात २, भटक्या जमाती मतदारसंघात २, तर इतर मागासवर्गीय मतदारसंघासाठी २ असे एकण ४० उमेदवार आता रिंगणात आहेत. १२ फेब्रुवारी रोजी मतदान व १३ रोजी मतमोजणी होईल. मावळत्या संचालक मंडळात २१ पैकी २० जागा आमदार प्रशांत बंब यांच्या निवडून आल्या होत्या. विरोधी गटाचे संजय जाधव हे एकमेव उमेदवार सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. याच मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा जाधव यांची निवड झाली आहे.

अपहार प्रकरणामुळे कारखाना चर्चेत

गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आमदार प्रशांत बंब, प्रभारी कार्यकारी संचालकांसह १६ जणांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. माजी चेअरमन कृष्णापाटील डोणगावकर यांनी संचालक मंडळावर अपहाराचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून गंगापूर सहकारी साखर कारखाना राज्यभरात चर्चेत आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com