Prashant Bamb : मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवरील कारवाईचा वाद पेटला; प्रशांत बंब यांचे सतीश चव्हाणांना खुले आव्हान!

Prashant Bamb on Satish Chavan : आमदार सतीश चव्हाण यांच्या पत्रातील प्रत्येक मुद्दा खोडून काढत बंब यांनी आज ८ पानी सविस्तर प्रत्युत्तर चव्हाण यांना पाठवले आहे. चव्हाण यांनी १०४६ शिक्षकांची वेतनवाढ बंद केल्याचा उल्लेख केला होता. त्यावर बंब यांनी खुलासा केला आहे.
Prashant Bamb controversy
Prashant Bamb controversySarkarnama
Published on: 
Updated on: 

Teachers Increment Issue : मराठवाडा, पदवीधर शिक्षक आमदारांची आपल्याला गरज नाही, हे मतदारसंघ रद्द केले पाहिजेत, अशी मागणी करत खळबळ उडवून देणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि मराठवाडा पदवीधरचे सतीश चव्हाण यांच्यात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरोधात प्रशांत बंब यांनी रान उठवले आहे.

गंगापूर-खुलताबाद या आपल्याच मतदारसंघातील तब्बल १०८६ शिक्षकांवर एक वर्षाची वेतन वाढ तीन वर्ष रद्द करण्याची कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. यासाठी आमदार बंब हे आग्रही होते. या कारवाईनंतर मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी बंब यांना उद्देशून एक पत्र लिहित त्यांच्या मुद्यांवर आक्षेप नोंदवला होता.

तसेच मतदारसंघातील रस्ते, गळक्या, छप्पर उडालेल्या शाळा आधी नीट करा, असा टोला लगावला होता. आधी शिक्षकांना सुविधा द्या, मग मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरा. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आणि आमदार नको म्हणणारे, बंब साहेब उद्या, विधान परिषदच नको, असे म्हणणार का? असा खोचक सवाल चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केला होता. आठवडाभरानंतर या पत्राला आता आमदार प्रशांत बंब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार सतीश चव्हाण यांच्या पत्रातील प्रत्येक मुद्दा खोडून काढत बंब यांनी आज ८ पानी सविस्तर प्रत्युत्तर चव्हाण यांना पाठवले आहे. चव्हाण यांनी १०४६ शिक्षकांची वेतनवाढ बंद केल्याचा उल्लेख केला होता. त्यावर बंब यांनी खुलासा केला की, संख्या १०४६ नसून १०८६ आहे आणि त्या सर्वांनी मुख्यालयी राहत असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र दिले होते. जर ते गावात राहत नसतील तर त्यांनी खोटी कागदपत्रे जोडली आहेत.

Prashant Bamb controversy
DK Shivakumar : डझनभर आमदारांची दोन लग्ने? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उडवून दिली राजकीय वर्तुळात खळबळ; नावे जाहीर करण्याची कर्नाटक भाजपची मागणी

मग अशा शिक्षकांवर आपण FIR दाखल करणार का? असा उलट सवाल बंब यांनीच केला. तर ७०% शिक्षकांना थ्री-स्टार, फाईव्ह-स्टार सुविधा हवी असा आरोप करत शिक्षक ज्या गावात मानाने राहतात, त्याच गावात नोकरी करतात. तिथे मूलभूत सुविधा आहेतच, परंतु ७०% शिक्षकांना ३-स्टार, ५-स्टार सुविधा पाहिजेत.

महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यानुसार प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व शिक्षकाला मुख्यालयी राहणे बंधनकारक करूनच नोकरी दिली जाते. शिक्षकांनी मुख्यालयी न राहता किमान तीन ते चार तास अप-डाऊनमध्ये वेळ वाया घालवून विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आणि स्वत:चे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बरबाद करणे हीच पिढी बरबाद होण्यास कारणीभूत आहे, असा आरोप बंब यांनी केला.

Prashant Bamb controversy
Pune Graduate Teacher Voter Registration : पुणे पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी पोर्टल बंद; अंतिम मुदतीपूर्वीच प्रक्रिया थांबली?

१८ वर्षांची श्वेतपत्रिका काढा, नाहीतर माफीपत्र पाठवा

तुम्ही १८ वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहात, मग प्राथमिक विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी, त्यांच्या पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि मराठवाड्यातील तरुणांसाठी उपजीविकेचे कोणते साधन निर्माण केले? असा सवाल बंब यांनी केला आहे. प्रत्येक तरुणाला रोजगाराचे साधन निर्माण करून देणे हे पदवीधर आमदाराचे काम होते, ते न करता तुम्ही ७०% शिक्षकांची लाचारी पत्करून मराठवाडा बरबाद करण्यास हातभार लावला.

तुम्हाला मिळालेले १८ वर्ष तुम्ही राज्याच्या बरबादीसाठी वापरले. स्वत: प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कंत्राटदार बनून बळकट झालात, हे देशद्रोही कृत्य आहे, अशी टीका बंब यांनी केली आहे. शेवटी बंब यांनी आव्हान दिले आहे की, हिंमत असेल तर तुमच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीची 'श्वेतपत्रिका' राज्यासमोर ठेवा, अन्यथा दोन ओळींचे 'माफीपत्र' विद्यार्थ्यांना, पदवीधरांना आणि नागरिकांना पाठवा, असे आव्हानच बंब यांनी सतीश चव्हाण यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com