Nanded : 'मला प्रचार करायचायं, नगरसेवक कुठं गेले'? वंचितच्या उमेदवाराची निवडणूक निरीक्षकांकडे धाव!

Prashant Ingole, Nanded MLC Election, Missing Corporators:नांदेड विधान परिषद निवडणुकीत नगरसेवक मतदार गायब असल्याचा आरोप करत वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली व त्यांचा शोध घेण्याची मागणी केली.
Maharashtra MLC Election
Maharashtra MLC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nanded MLC: नांदेड विधान परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. १८ जून रोजी विधान परिषदेसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. मात्र महायुती, महाविकास आघाडीचे नगरसेवक सहलीवर गेल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी आज नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निरीक्षकांची भेट घेऊन मला प्रचार करायचायं, नगरसेवक कुठे गेले? असा सवाल केला आहे.

नगरसेवकांना कोणी गायब केले का? त्यांचे कोणी अपहरण केले का? त्यांच्यासोबत काही घातपात झाला का? याचा शोध घ्या, अशी मागणी इंगोले यांनी करत खळबळ उडवून दिली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना सूचना देऊन या सगळ्या नगरसेवक, मतदारांना सुखरूप परत आणा, अशी मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे. आम्ही प्रचारासाठी नगरसेवकांचा शोध महापालिका, नगरपरिषदेत जाऊन, त्यांच्या घरी जाऊन शोध घेत आहोत. पण ते कुठे गायब झालेत? याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देखील नाही.

Maharashtra MLC Election
MLC Election : 'कोणी कोणाला किती 'नोटा' दिल्या हे तरी मोजा!' निवडणूक प्रशिक्षणात 'नोटा'वरून अधिकारी-नगरसेवक आमनेसामने!

नगरसेवक गोव्याला, गुवाहाटी, कोकणात, तिरुपतीला गेल्याची चर्चा आहे. एखाद्या मतदाराला सहलीला नेणे हा देखील आचारसंहिता भंगाचा भाग आहे. निवडणुक निरीक्षकांनी याची दखल घेऊन तातडीने या नगरसेवकांना सुखरूप जिल्ह्यात शोधून आणावे. त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे का? याचा शोध घेणे गरजेचे आहे. मतदारांना सहलीवर नेणे हा लोकशाहीचा अपमान आहे. जनावारांची बोली लागावी तशी नगरसेवकांची बोली लावली जात आहे, त्यांना टोकण म्हणून काही रक्कम दिली जात आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी मारक आहे.

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ४५२ मतदार आहेत. पण यापैकी निम्मे नगरसेवक गायब आहेत. त्यांचे अपहरण झाले आहे का? त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे का? जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांनी या सगळ्या नगरसेवकांचे लोकशन ट्रॅक करावे, सीडीआर चेक करावे आणि त्यांना सुखरूप घरी आणावे, अशी मागणी प्रशांत इंगोले यांनी केली. निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवकांचा प्रतिनिधी म्हणून एकाला हे मतदार निवडून विधान परिषदेत पाठवणार आहेत. विशेष म्हणजे प्रस्थापित पक्षाचे दोन्ही उमेदवार हे तर नगरसेवकही नाहीत. मी एकमेव नगरसेवक उमेदवार आहे.

Maharashtra MLC Election
MLC Election : 'कोणी कोणाला किती 'नोटा' दिल्या हे तरी मोजा!' निवडणूक प्रशिक्षणात 'नोटा'वरून अधिकारी-नगरसेवक आमनेसामने!

नगरसेवकांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेत करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. जे प्रश्न जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सोडवत नाहीत, प्रश्न विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडून ते सोडवण्याची जबाबदारी नगरसेवकांच्या प्रतिनिधीवर असणार आहे. पण जे नगरसेवकच नाही त्यांना त्यांचे प्रश्न काय समजणार? असा सवालही इंगोले यांनी निरीक्षकांच्या भेटीनंतर केला. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी गायब झालेल्या नगरसेवक मतदारांना शोधून आणा, अशी मागणी इंगोले यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com