Dharashiv News : प्रशांत नवगिरेंचे राष्ट्रवादी पुन्हा…, दुसऱ्यांदा बांधले घड्याळ; नव्या जबाबदारीचा शब्दही घेतला!

Prashant Navgire Joins Sharad Pawar Group : प्रशांत नवगिरी पुन्हा चर्चेत आहेत. पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्याने ते चर्चेत आलेत....
Sharad Pawar- Prashant Navgire
Sharad Pawar- Prashant Navgire Sarkarnama

Dharashiv Politics News : शिवसेना, महाराष्ट्र निर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पुन्हा मनसे त्यानंतर भारत राष्ट्र समिती आणि शरद पवारांकडे जाऊन पुन्हा राष्ट्रवादीचा नारा देऊन अर्धा डझन राजकीय पक्ष फिरणाऱ्या प्रशांत नवगिरेंनी अखेर मनगटावर घड्याळ बांधलेच.

विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जुन्या राष्ट्रवादीत पवारसाहेब, बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, नव्या राष्ट्रवादीत थेट अजित पवारांपर्यंत पोहोचून नवगिरेंनी पक्ष प्रवेशाच्या चाली केल्या. मात्र, अशा प्रकारे राजकीय कोलांटउड्या मारून नवगिरेंनी धाराशिवमधील सगळ्याच राजकीय पक्षांतील नेत्यांना चक्रावून टाकले आहे.

Sharad Pawar- Prashant Navgire
Sharad Pawar News : पवार-वळसे पाटील यांच्या भेटीने भुवया उंचावल्या; काही महत्त्वाचे निर्णय घातले कानावर!

ठाकरेंच्या शिवसेनेत विशेषतः राज ठाकरेंच्या नेतृत्वात नवगिरेंनी १९९५ मध्ये विद्यार्थी सेनेतून राजकारण सुरू केले. तेव्हा राज यांच्यासोबत जवळीक करून त्यांनी विद्यार्थी सेनेत वजन वाढले. त्यानंतर शिवसेनेचे धाराशिवचे तत्कालीन संपर्कप्रमुख बाळ हरदास यांच्या साथीने नवगिरेंनी मातोश्रीवर बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. या काळात धाराशिवमधून थेट मातोश्री कनेक्शन ठेवणारे नवा चेहरा ही नवगिरेंची ओळख राहिली. या सगळ्या 'कॉन्टॅक्ट'चा नवगिरेंनी पुरेपूर राजकीय फायदा उठवला.

पुढच्या काळात म्हणजे, २००६ मध्ये शिवसेनेतून राज ठाकरे फुटताच तिकडे धाराशिवमध्ये नवगिरेंनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत मनसेचा झेंडा हाती घेतला. ही संधी साधून नवगिरेंनी पुन्हा राज यांचा विश्वास जिंकला आणि मनसेच्या विस्तारासाठी मराठवाड्याची जबाबदारी घेतली. याच काळात नवगिरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि मनसेच्या 'एसटी' कामगार सेनेचे राज्य पातळीवरचे पद खेचून आणले. या पदावरचे काम दाखवून नवगिरेंनी २०१३ मध्ये मनसेचे धाराशिव जिल्हाध्यक्षपद खेचून आणले.

मनसेत एवढे मिळवूनही नवगिरे हे समाधानी राहिले नाहीत आणि ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी मनसेला धक्का दिला. पण, राष्ट्रवादीतील गटबाजी न झेपलेल्या नवगिरेंनी पुन्हा रेल्वे इंजिनातून राज ठाकरेंचे 'कृष्णकुंज' गाठले. अर्थात, स्वगृही म्हणजे मनसेत प्रवेश केला आणि पुन्हा कामाला लागले. परंतू, महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करण्याच्या उद्देशाने आलेल्या बीआरएसच्या वादळात अडकलेल्या नवगिरेंनी राज यांना 'बाय बाय' केला आणि मनसेत धुरळा उडविला. यानिमित्ताने नवगिरेंनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला.

थेट चंद्रशेखर रावांकडे जाऊन त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मीडिया सेलचे पद घेतले. प्रवेशामुळे नवगिरेंनी मराठवाड्यात हवा केली. रावांच्या पंढरपूर दौऱ्यात महत्त्वाची भूमिका घेऊन नवगिरेंनी ‘बीआरएस’च्या काही नेत्यांना मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, नवगिरेंना पुन्हा राष्ट्रवादीची भुरळ पडली. आणि त्यांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा इरादा केला. त्याआधी शरद पवारसाहेबांच्या भेटी घेऊन नवगिरेंनी आपल्या संभाव्य नव्या जबाबदारीचा शब्दही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच काही वर्षांच्या राजकारणात सहा वेळा सहा राजकीय पक्ष बदलून नवगिरेंनी राजकीय वर्तुळाच अवाक् करून ठेवले आहे. मात्र, हेच नवगिरे आता राष्ट्रवादीचे घड्याळ किती दिवस बांधून ठेवणार? याकडेही लक्ष असेल.

Sharad Pawar- Prashant Navgire
Pawar family :राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र ; जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com