Pawar Family : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र; जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule News : अजित पवारांच्या आजारपणाबाबतही दिली आहे प्रतिक्रिया
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Pune Political News : आज संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्त एकत्र जमलं होतं . ज्येष्ठ उद्योजक आणि सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य पवार कुटुंबीय जमलेले होते. या सगळ्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Sharad Pawar News : पवार-वळसे पाटील यांच्या भेटीने भुवया उंचावल्या; काही महत्त्वाचे निर्णय घातले कानावर!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''दरवर्षी बारामतीला पूर्ण कुटुंब जमा होतं. परंतु यंदा प्रतापराव पवार यांच्या पत्नींची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते कुटुंब यंदा बारामतीला येणार नाही. त्यामुळे दिवाळीची सुरुवात आज प्रतापराव पवारांच्या घरून झाली. आता दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण संपूर्ण दिवाळीत बारामतीमध्ये असणार आहोत.''

याचबरोबर ''अजितदादांची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. डेंग्यू झाल्यावर पोस्ट डेंग्यू म्हणजेच जरी रिपोर्ट नॉर्मल आलेले असतील, तरी प्लेटलेट्सचं बरेच दिवस बघावं लागतं. कारण, अनेकदा डेंग्यूच्या प्रकरणात आपण बघितलेलं आहे की लोकांना पुढे जास्त त्रास होतो .'' असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

Supriya Sule
Bacchu Kadu on Maratha: पवारांनी तेव्हाच आरक्षणात घेतलं असतं तर मराठ्यांचा प्रश्नच मिटला असता

याशिवाय ''काही वर्षांपूर्वी मला स्वत:ला डेंग्यू झालेला आहे. त्यामुळे डेंग्यूनंतरची काळजीही महत्त्वाची असते. अशक्तपणाही खूप जाणवतो. त्यामुळे काही दिवस अजितदादांना काळजी घ्यावी लागेल. सध्या प्रदूषण प्रचंड वाढले आहे. पुणे, मुंबई, दिल्लीत अतिशय वाईट हवा राहत आहे. त्यामुळे या सगळ्या काळात डेंग्यूनंतरची काळजी घेणं गरजेचं आहे.'' असंही या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com