Pratap Patil Chikhlikar : आमदार चिखलीकरांवर नेते अजितदादांचा प्रभाव ; वैद्यकीय अधीक्षक, डाॅक्टरांना भरला दम

MLA Pratap Patil Chikhlikar expressed anger over poor healthcare facilities and issued warnings to doctors and officials during his recent visit. : लोहा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा द्या, नाहीत खुर्च्या खाली करा, असा दमच चिखलीकरांनी भरला एवढेच नाही.
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर वन करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. याशिवाय लोहा-कंधार या आपल्या मतदारसंघातील मतदार आणि नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजीही घेताना ते दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात.

विशेषत: कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना फैलावर घेताना ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिखलीकरांनी मतदारसंघात कार्यपद्धती अवलंबल्याचे दिसते. लोहा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा द्या, नाहीत खुर्च्या खाली करा, असा दमच चिखलीकरांनी (Pratap Patil Chikhlikar) भरला एवढेच नाही. तर वैद्यकीय अधीक्षकासह काही डाॅक्टरांच्या बदल्यांची मागणीही चिखलीकरांनी लावून धरली आहे.

लोहा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांची सध्या दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. सुविधा मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी रविवारी रुग्णालयाला अचानक भेट दिली. (NCP) वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टर मुख्यालयी उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून यावेळी केल्या गेल्या. असुविधा आणि कामचुकारपणा आढळून आल्याने चिखलीकर चांगलेच संतापले.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar : मित्र पक्षातले दोन शत्रू चव्हाण अन् चिखलीकर वर्चस्वासाठी भिडणार!

कामचुकार डॉक्टरांना माफी नाही, आरोग्य सेवा सुधारली नाही, तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशाराच चिखलीकरांनी यावेळी दिला. संबंधितांना कड शब्दात सूचना देतानाच त्यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांकडे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांची बदली करण्याची शिफारस केली. तसेच तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Ajit Pawar News : 'मला छक्के पंजे चालत नाही', अजितदादांची जोरदार फटकेबाजी

चिखलीकरांच्या या पाहणी दौऱ्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. आमदारांनी रुग्णालयाला भेट दिल्याचे कळताच उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल बारी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी सभापती खुशाल पाटील पांगरीकर, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, भास्कर पाटील, पंचशील कांबळे, डॉ. लोहारे, बी. डी. जाधव आणि कर्मचाऱ्यांनी पळापळ केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com