Pratap Patil Chikhlikar News : प्रताप पाटील चिखलीकर ठरतोय अजित पवारांचा नांदेडमधील हुकमी एक्का!

MLA Pratap Patil Chikhlikar aims to make the Nationalist Congress Party (NCP) the number one party with the solid support of Deputy CM Ajit Pawar. : अजित पवारांमुळे चिखलीकरांचे राजकीय पुनर्वसन झाले. या उपकाराची परतफेड आता नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा करण्याचा निर्धार करत सुरू केली.
Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत राजकारणाची सुरवात करणारे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला अशोक चव्हाण यांची भाजपातील एन्ट्री जबाबदार असल्याचे चिखलीकर वारंवार सांगतात. काँग्रेसमध्येच राहिलो असतो तर साधा जिल्हा परिषद सदस्यही झालो नसतो, असे म्हणत चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधातील रोष वारंवार व्यक्त केला आहे.

आता लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी अशोक चव्हाणांसोबत काम करणे नकोच, अशी भूमिका घेतली. विधानसभेसाठी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची निवड केली आणि विजय मिळवला. अजित पवारांनी ऐनवेळी पक्षप्रवेश आणि उमेदवारी दिल्याने चिखलीकरांचे राजकीय पुनर्वसन झाले. या उपकाराची परतफेड चिखलीकर यांनी आता नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा करण्याचा निर्धार करत सुरू केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुरूंग लावण्याचे काम केले. काँग्रेसचे चार माजी आमदार ज्यामध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांचाही समावेश आहे. ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, मोहन हंबर्डे हे काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केल्यानंतर या सगळ्यांवर अशोक चव्हाण यांची नजर होती.

Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
Ajit Pawar News : एखाद्या प्रकल्पाचे नारळ फोडल्यानंतर त्याला चाळीस वर्ष लागतात, हे आमचं अपयशच! लेंडी प्रकल्प पूर्ण करणार

टप्याटप्याने या समर्थकांना भाजपामध्ये खेचून आपले राजकीय वजन वाढवण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न होता. परंतु चिखलीकर यांनी तो डाव हाणून पाडला आणि या चार माजी आमदारांसह काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, महापालिकेतील माजी नगरसेवक अशा सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अशोक चव्हाण यांना हादरे दिले. अजित पवारांनी दाखवलेला विश्वास आणि अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेला दगा यातून चिखलीकर पेटून उठले.

Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
Pratap Patil Chikhlikar News : बरं झालं लोकसभेला हरलो.. नाहीतर अजित पवारांच्या नेतृत्वात काम करता आले नसते!

अजित पवारांचा विश्वास जिंकला..

विधानसभा निवडणुकीत चिखलीकर विजयी झाले आणि त्यांनी नांदेडमध्ये पक्ष वाढीसाठी टाॅप गेअर टाकला. अजून आपण भाजपाकडे लक्ष दिलेले नाही, असे सांगत चिखलीकर यानी अशोक चव्हाण यांना एकप्रकारे सावधानतेचा इशारा दिला आहे. महायुती आणि भाजपा हा मित्रपक्ष असल्याने चिखलीकर सध्या संयमाने घेत आहेत. पण अशोक चव्हाण जर माझ्या नादाला लागले तर मी सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा देत चिखलीकर यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar : मित्र पक्षातले दोन शत्रू चव्हाण अन् चिखलीकर वर्चस्वासाठी भिडणार!

गेल्या दोन महिन्यात अजित पवार यांना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नांदेडचा तिसऱ्यांदा दौरा करावा लागला. अजून मोठे प्रवेश सोहळे होतील आणि अजित पवारांना यावे लागेल, असे चिखलीकर यांनी म्हटले आहे. काल मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे झालेल्या शेषराव चव्हाण त्यांचे कुटुंबिय आणि अशोक चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन चिखलीकर यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण केले. मुखेड-बिलोली तालुक्यातील 38 हजार वंजारी मते या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळू शकतात.

Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
NCP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पुतण्याने सोडली काकाची साथ, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का!

निश्चितच याचा फायदा नांदेडमध्ये आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, परिषद,पंचायत समिती निवडणुकींमध्ये पक्षाला होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर अनेकांना असुरक्षित वाटू लागले आहे. चिखलीकर यांनी वेळीच सावध होत आपला मार्ग बदलला. एकाच पक्षात राहून अशोक चव्हाण यांना विरोध करणे शक्य नाही. शिवाय भाजपामध्ये ते आपल्याला पुढे जाऊ देणार नाही, याची जाणीव चिखलीकर यांना झाली होती. हीच भावना मुळ भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांमध्येही आहे.

Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News
Devendra Fadnavis On Marathwada Drought : मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला पहावा लागणार नाही! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

खासदार अजित गोपछडे यांनी अशोक चव्हाण हे भाजपामध्ये अजगरा एवढे मोठे होतील, असे विधान केले होते. ते संघटनात्मक पदांच्या निवडीवरून दिसून येणार आहे. मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर शहर-जिल्हाध्यक्ष, महानगरप्रमुख अशा सगळ्याच पदांवर चव्हाण यांनी आपल्या समर्थकांची नावे पुढे रेटली आहे. त्यामुळे याचा फटका भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बसू शकतो. दुसरीकडे प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून स्वीकारल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com