Pratap Patil Chikhalikar News : आता कुठेही जाणार नाही सांगणार्‍या प्रताप पाटील चिखलीकरांचे राष्ट्रवादीत वजन वाढले; अजितदादांचा विश्वासही कमावला!

Pratap Patil Chikhlikar Strengthened in NCP, Earned Ajit Pawar's Trust : अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळेच चिखलीकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली, असे बोलले जाते. चिखलीकर यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला हे गेल्या काही महिन्यातील घडामोडी, दुसऱ्या पक्षातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत होणारे प्रवेश पाहता म्हणावे लागेल.
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षात फिरून आलेल्या लोहा-कंधार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पक्षातील वजन वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीसाठी सहा महिन्यापुर्वी चिखलीकर यांनी भाजपाला रामराम ठोकला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश आणि उमेदवारी मिळवली अन् निवडूनही आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नांदेडमध्ये नव्या नेत्याच्या शोधात असलेल्या अजित पवारांचा शोधही चिखलीकर यांच्यापर्यंत येऊन थांबला.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यातील संघर्ष जुना आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी पक्षप्रवेश केल्यानंतरही चव्हाण-चिखलीकर यांच्या फारसे जमले नाही. दोघे निवडणूक प्रचारानिमित्त एका व्यासपीठावर आले, पण चिखलीकर यांचा पराभव झालाच. ज्या अशोक चव्हाण यांना पराभूत करून मी खासदार झालो, ते पक्षात आल्यानंतर मी पडलो, असा टोला चिखलीकर यांनी नुकताच लगावला होता. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळेच चिखलीकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली, असे बोलले जाते.

चिखलीकर यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला हे गेल्या काही महिन्यातील घडामोडी, दुसऱ्या पक्षातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत होणारे प्रवेश पाहता म्हणावे लागेल. आमदार झाल्यानंतर चिखलीकर यांनी खऱ्या अर्थाने कात टाकली आणि (Ajit Pawar) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी पक्षप्रवेशांचा धडाका लावला. महिनाभरात अजित पवारांना यासाठी नांदेड जिल्ह्यात दोन दौरे करावे लागले. पुढील काळात आणखी दौरे त्यांना करावे लागणार, असे चित्र आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी शरद पवारांची साथ दिली होती.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Ajit Pawar : 'आता नकोसं झालंय', 1000 कोटींचा निधी दिलाय, नुसते फोटो काढून...'; अजितदादांचा भर स्टेजवर संताप

विधानसभा निवडणुकीनंतर मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षातून राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढले. चार माजी आमदारांना पक्षात आणत प्रताप पाटील चिखलीकर यांनी मास्टरस्ट्रोक लगावला. पण खरी कमाल तेव्हा झाली जेव्हा अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, मीनल खतगावकर व त्यांच्या इतर समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Pratap Patil Chikhlikar News : अजून मी भाजपाला हात घातलेला नाही! चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना सूचक इशारा!

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नरसी येथे झालेल्या या पक्षप्रेवश सोहळ्याने इतर राजकीय पक्षांच्या उरात धडकी भरली. अजून मी भाजपाला हात घातलेला नाही, असे सांगत प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना सूचक इशारा दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टाने प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाला विशेषतः अशोक चव्हाण यांना रोखण्याची रणनिती आखली आहे.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar News
Bhaskarrao Khatgaonkar Patil Join NCP : कॉंग्रेसला धक्का देत भास्करराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवार यांच्यासारखे खमके नेतृत्व आणि त्यांचे पाठबळ चिखलीकर यांना मिळत असल्याने सध्या त्यांची गाडी सुसाट निघाली आहे. मुंबईतील पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना चिखलीकर यांची हजेरी आणि त्यांचे विचारात घेतले जाणारे मत पाहता नांदेड जिल्ह्याची सगळी सूत्र भविष्यात चिखलीकर यांच्याच हाती असतील, हे स्पष्ट आहे. अनेक प्रश्न फिरून आल्यामुळे आपल्या राष्ट्रवादीतील कार्यकाळावर शंका घेतली जाते याची जाणीव असलेल्या चिखलीकर यांनी आता कुठेच जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार, अशी ग्वाही दिली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com