Nanded loksabha Constituency : नांदेडमध्ये आघाडी-पिछाडीचा खेळ सुरूच चिखलीकरांना मागे टाकत चव्हाण पुढे

Prataprao Chikhalikar And Vasant Chavan maharashtra Nanded loksabha matdar sangh nikal : ताज्या माहितीनुसार काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर तब्बल 9000 मतांची आघाडी घेत महायुतीला धक्का दिला आहे.
Nanded loksabha Constituency
Nanded loksabha ConstituencySarkarnama

Nanded loksabha : नांदेड लोकसभेच्या निकालामध्ये आघाडी पिछाडीचा खेळ सुरू असून कधी महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर तर दुसऱ्या क्षणाला महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण पुढे अशी काहीशी स्थिती सुरुवातीच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये दिसून आली आहे.

माजी मुख्यमंत्री व भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र ताज्या माहितीनुसार काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर तब्बल 9000 मतांची आघाडी घेत महायुतीला धक्का दिला आहे.

अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. मात्र चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेत नांदेडची जागा मोठा मताधिक्क्याने निवडून आणण्याचा दावा केला होता.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मंत्री व लातूर शहर चे आमदार अमित देशमुख यांनी नांदेड मध्ये आता वसंत ऋतू बहरणार, असे सांगत अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार असल्याचे संकेत दिले होते.

Nanded loksabha Constituency
Narayan Rane : आघाडीत 'एक ना धड भाराभर चिंध्या'; नारायण राणेंचा काँग्रेसवर घणाघात

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्या फेरीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये या आघाडी पछाडीचा खेळ सुरू झाला. यात कधी चिखलीकर पुढे तर वसंत चव्हाण पिछाडीवर असे चित्र होते.

Nanded loksabha Constituency
Satara Loksabha Election 2024 Result: साताऱ्यात मोदींचा नव्हे पवारांचा करिष्मा; शशिकांत शिंदे आघाडीवर

आता ताज्या माहितीनुसार वसंत चव्हाण यांनी चिखलीकररांवर मोठी आघाडी घेत महायुतीला नांदेडमध्ये धक्का दिला आहे. वसंत चव्हाण यांची आघाडी पुढे कायम राहते का? यावर नांदेड जिल्ह्यात भाजपचे कमळ पुन्हा फुलणार की काँग्रेस बाजी मारणार? हे अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com