Dharashiv Loksabha Constituency : प्रवीणसिंह परदेशी धाराशिव लोकसभा लढवणार ? स्वत:च केला मोठा खुलासा

Praveen Singh Pardeshi : धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांपैकी प्रवीणसिंह परदेशी यांचे एक नाव चर्चेत आहे.
Praveen Singh Pardeshi
Praveen Singh PardeshiSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांपैकी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव सध्या अग्रक्रमाने चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त सचिव राहिलेले प्रवीणसिंह परदेशी यांचेही दौरे सध्या जिल्ह्यात वाढले आहेत. लोकसभा उमेदवारी संदर्भात परदेशी यांनी अद्यापपर्यंत कोणताही खुलासा किंवा प्रतिक्रियाही दिली नव्हती. (Dharashiv Loksabha Constituency)

174 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर जिल्हा विकासाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी खुलासा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praveen Singh Pardeshi
Dharashiv Loksabha Constituency : प्रवीणसिंह परदेशींना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ ? चर्चांना उधाण

मागील काही महिन्यांपासून माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे धाराशिव जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यम कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना प्रवीण सिंह परदेशी यांना आपण ओळखता का ? त्यांनी 1993 साली झालेल्या भूकंपाच्या काळात केलेले काम आपल्याला माहित आहे का ? असा व्यक्ती लोकसभा निवडणुकीत उभा राहिल्यास आपण त्याला पसंती द्याल का ? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करून प्रवीणसिंह परदेशी यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या डझनभर इच्छुकांच्या नावात प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव सुद्धा अग्रक्रमाने घेतले जात होते.

याबाबत स्वतः प्रवीणसिंह परदेशी यांनी आज माध्यमांशी बोलताना या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र खासदार म्हणून काम करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक असते आणि आत्ता तूर्तास तरी आपल्या हातात काही नाही, असे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरून उमेदवारीसाठी असलेली इच्छा ते लपवू शकले नाहीत.

(Edited By-Ganesh Thombare)

Praveen Singh Pardeshi
Lok Sabha Election 2024 : विखे पाटलांनी वाढवलं खासदार हेमंत गोडसेंचं टेन्शन; नाशिकबाबत केलं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com