Lok Sabha Election 2024 : विखे पाटलांनी वाढवलं खासदार हेमंत गोडसेंचं टेन्शन; नाशिकबाबत केलं मोठं विधान

BJP and Shivsena Loksabha Politics: भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या आढाव्याची बैठक आज दिंडोरीत पार पडली.
Radhakrishnan Vikhe- Patil and MP Hemant Godse
Radhakrishnan Vikhe- Patil and MP Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics News: नाशिकमध्ये भाजपने मोठी संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघ भाजपला मिळावा ही मागणी आहेच, असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले. विखे पाटील यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार आहे. (Lok Sabha Election 2024)

विशेषतः विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सध्या ते प्रचारात देखील व्यस्त आहेत. असे असताना आज दिंडोरी येथे झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती आणि भाजपची कोर कमिटी यांच्या बैठकीत नाशिक मतदारसंघ भाजपला मिळावा, या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिला. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होणार हे नक्कीच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishnan Vikhe- Patil and MP Hemant Godse
Chhagan Bhujbal News : आमचं होतं घड्याळ अन् लोक पंजावर शिक्का मारायचे, आता जमाना बदलला; तुतारीवर भुजबळ म्हणाले...

दिंडोरी येथे झालेल्या बैठकीत काही पदाधिकारी आणि नेत्यांनी नाशिक हा मतदारसंघ देखील भाजपकडे असावा, अशी मागणी केली आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील नाशिक दिंडोरी आणि धुळे हे तिन्ही मतदारसंघ भाजपकडे राहतील. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या घटक पक्षांच्या वाट्याला काय येणार ? याची चिंता सहकारी पक्षांतील दावेदार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सतावणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक मतदारसंघ महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चर्चा आणि विवादाचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने गेली वर्षभर विविध स्तरावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अनेक इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहेत.

मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीत समाविष्ट झाल्यावर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना येथून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आता भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितल्यास घटक पक्षांसाठी कोणते पर्याय देणार हा नवा राजकीय वाटाघाटींचा विषय ठरणार आहे. या सर्व स्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की.

(Edited By-Ganesh Thombare)

Radhakrishnan Vikhe- Patil and MP Hemant Godse
KC Padvi News : माजी मंत्री पाडवींचा पाय आणखी खोलात; प्रकरण पोहोचलं पटोले, वडेट्टीवार, चव्हाणांपर्यंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com