Loksabha Election : बीडमध्ये प्रीतम मुंडे मुंडेंच्या लोकसभेची तयारी अन मेळाव्याकडे 'या' भाजप आमदारांचीच पाठ

Political News : भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडेंच्या लोकसभा तयारीची पहिली पायरी होती.
pritam munde, suresh dhas, laxamn munde, namita mundada
pritam munde, suresh dhas, laxamn munde, namita mundada Sarakarnma
Published on
Updated on

Beed News : आगामी लोकसभा निवडणुकाजवळ आल्याने सर्वच पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने, विशेषत: भाजपने कंबर कसली आहे. यासाठी राज्यभर जिल्हानिहाय महायुती मित्रपक्षांची संमेलने झाली. बीडचे संमेलन म्हणजे भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडेंच्या लोकसभा तयारीची पहिली पायरी होती. मात्र, या संमेलनाकडे भाजपच्या तीन आमदारांनीच पाठ फिरविली. या तीन आमदारांनी मेळाव्याला दांडी मारल्याने मेळाव्यास्थळी मोठी चर्चा रंगली होती.

जिल्ह्यात विधानसभेला गेवराईतून भाजपचे लक्ष्मण पवार व केजमधून नमिता मुदंडा आमदार आहेत. तर, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीत्व सुरेश धस करतात. भाजपचे हे तीनही आमदार रविवारी झालेल्या महायुती मित्रपक्षांच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

pritam munde, suresh dhas, laxamn munde, namita mundada
Uddhav Thackeray : दिव्यात उद्धव ठाकरेंकडे एकही शाखा नाही; मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती काय ?

भाजपला आगामी लोकसभा निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारीची सुरुवातही केली आहे. महायुतीमध्ये वरचेवर मित्रपक्ष वाढत आहेत. या मित्रपक्षांचा निवडणुकीत फायदा व्हावा, मतभेद दुर व्हाव्यात, त्यांच्या भावना समोर याव्यात या हेतूने महायुतीने प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांसह सर्व मित्रपक्षांचे रविवारी जिल्हावार संमेलने घेतली.

बीडच्या संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यावर होती. मागील आठ दिवसांपासून सर्व मित्रपक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे सुरु होती. दरम्यान, बीडचे संमेलन म्हणजे खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीची तयारीच होती.

रविवारच्या संमेलनाला पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde), खासदार डॉ. प्रितम मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, समन्वयक अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, शिवसंग्रामचे तानाजी शिंदे, भाजपचे रमेश आडसकर, विजयसिंह पंडित, अनिल जगताप, राजेश्वर चव्हाण, कुंडलीक खांडे, राजेंद्र मस्के, सचीन मुळूक, नारायण काशीद, सुरेश नवले, संजय दौंड, भिमराव धोंडे, आर. टी. देशमुख, अशोक डक, बबन गवते, अनिल तुरुकमारे, सलीम जहांगीर, मोहन जगताप आदी महायुतीच्या मित्रपक्षांचे नेते हजर होते.

प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

भाजपसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करुन पुन्हा विजयाचा विश्वास व्यक्त केला. मेळावा मित्रपक्षांचा असला तरी जणू डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठीच मेळावा झाला असे चित्र होते. पण, भाजपचे लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा व सुरेश धस मेळाव्याला नव्हते.

(Edited by Sachin Waghmare)

pritam munde, suresh dhas, laxamn munde, namita mundada
Pankaja & Pritam Munde News : मुंडे भगिनींची भाजपच्या राज्यस्तरीय शिबिराला दांडी; राजकीय चर्चांना उधाण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com