एक लाखाची लाच घेतांना शेतकरी संघटनेचा अध्यक्ष, पुरवठा अधिकारी जाळ्यात

अर्जाची चौकशी करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यामार्फतच संबंधिताकडे तडजोड आणि त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. (anti corruption bureau)
Anti Corruption Raid

Anti Corruption Raid

Sarkarnama

माजलगाव : मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज देत पैशाची मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह एका पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. (Anti Curruption) शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारा पुरवठा अधिकारी एस. टी. कुंभार या दोघांना आज लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. (Beed)

माहिती अधिकाराचा दुरूपयोग करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्रास देणे, त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे असे प्रकार बरेचदा समोर येत असतात. एखादा अधिकारी ऐकत नाही म्हटले की त्याच्यावर आरोप करून, त्याच्या विरोधात तक्रारी, अर्ज असे प्रकारही सुरू होतात. शेतकरी संघटनेचे काम करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करा, अशी मागणी करत तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला.

अर्जाची चौकशी करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यामार्फतच संबंधिताकडे तडजोड आणि त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. पण संबंधितांने आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यामुळे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आणि पुरवठा अधिकारी दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने केली होती. याची चौकशी पुरवठा अधिकारी एस. टी. कुंभार यांच्याकडे होती. या प्रकरणात नरवडे याने पैशाची मागणी केली व त्यात कुभार यांनी मध्यस्थी केली.

<div class="paragraphs"><p>Anti Corruption Raid</p></div>
Jalna District :असे काय घडले, की महिलेने चार लेकरांसह मृत्यूला कवटाळले..

शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कुंभार यांच्या राहत्या घरी एक लाख रुपयांची मागणी संबंधिताकडे करण्यात आली. ही रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांच्या पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडले. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com