पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवीन मंत्री डॉ.भागवत कराडांचं कौतुक फार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे खूप कौतुक आहे.
Bhagwat Karad and Narendra Modi
Bhagwat Karad and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांचे खूप कौतुक आहे. याला कारण कराडांचा डॉक्टरी पेशा आहे. त्यांच्या डॉक्टरी पेशाची झलक ते मंत्री झाल्यानंतरही अनेकदा पाहायला मिळाली. औरंगाबादेत रस्त्यावर रिक्षा उलटली तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा कुठलाही बडेजाव न दाखवता गाडीतून उतरून जखमी मुलावर जागेवर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला आपल्याच गाडीतून रुग्णालयात नेले होते. आता विमान प्रवासात देखील त्यांनी रक्तदाब वाढलेल्या प्रवाशावर उपचार केल्याचे समोर आले आहे. याचे मोदींनी जाहीरपणे कौतुक केले आहे.

मोदींनी जाहीरपणे ट्विटरवर डॉ. कराड यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. मनातून कायम डॉक्टर! माझे सहकारी डॉ.कराड यांनी मोठे मन दाखवले आहे, असे मोदींनी म्हटले आहे. डॉ. भागवत कराड हे बालरोगतज्ञ व शल्यचिकित्सक आहेत. मराठवाड्यातील पहिले बाल शल्यचिकित्सक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. आता तेच डॉक्टर कराड हे देशाची गुतांगुतीची अर्थव्यवस्था योग्य मार्गवर आणण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पण हे करत असतांनाच त्यांचा डॉक्टरी पेशा आणि त्यांच्या या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संकट समयी ते वापरतात.

Bhagwat Karad and Narendra Modi
कंगनावर राखी सावंत भडकली अन् म्हणाली...

औरंगाबादमधील रिक्षा अपघातानंतर आता दिल्ली ते मुंबई प्रवासा दरम्यान देखील त्यांनी आपल्या डॉक्टरी पेशाच्या अनुभवावर एका प्रवाशाला बरे केले. कराड हे नुकतेच इंडिगो विमानाने दिल्लीहून-मुंबई मार्गे औरंगाबादला येण्यासाठी निघाले होते. दिल्ली विमानतळावरून विमानाने टेकऑफ केले आणि अचानक एका प्रवाशाचा रक्तदाब वाढला आणि तो बेशुद्ध होऊन सीटवरच कोसळला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून डॉ. भागवत कराड आपल्या सीटवरून उठले आणि बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाच्या दिशेने गेले.

Bhagwat Karad and Narendra Modi
देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट..! नवाब मलिकांचा टोमणा

आपण डॉक्टर असल्याचे त्यांनी सांगितले आणि बेशुद्ध झालेल्या प्रवाशाची नाडी तपासली. रक्तदाब वाढल्याने या प्रवाशाला चक्कर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने प्रथोमचार म्हणून या प्रवाशाला काही औषधी देण्यास सांगितले, त्यानंतर तो प्रवासी शुद्धीवर आला. डॉ.भागवत कराड यांनी योग्यवेळी प्रवाशावर उपचार दिल्याने पुढील अनर्थ टळला, त्यामुळे प्रवाशांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com