Beed Lok Sabha Election 2024 : फडणवीसांच्या 'त्या' गॅरंटीनं प्रीतम मुंडेंची उमेदवारी पक्की?

Pritam Munde News : 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी संसदेत पोहाेचल्या. 2019 लादेखील त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळविला, पण...
cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danve
cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danvesarkarnama
Published on
Updated on

Beed News : काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) दृष्टीनं भाजप मित्रपक्षांच्या महायुतीचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं खासदार प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. "पुढील वाढदिवसाला प्रीतम मुंडे सर्वांना जेवण देतील, ही आपली गॅरंटी आहे," असं विधान फडणवीसांनी केलं आहे. फडणवीसांनी या गॅरंटीमुळे लोकसभा निवडणुकीला बीडमधून प्रीतम मुंडेंनाच उमेदवारी मिळणार, अशी पक्की 'गॅरंटी' समर्थकांची झाली आहे.

cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danve
Maratha Aarakshan Vishesh Adhiveshan: 'विशेष अधिवेशन' बोलावलं खरं; पण जरांगेंच्या लढ्याला यश मिळणार का?

महिनाभरापूर्वी बीडमध्ये महायुती मित्रपक्षांच्या मेळाव्यात पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे, भाजपचे भीमराव धोंडे, रमेश आडसकरांसह अन्य नेत्यांनी प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब केलं होते. त्यातच फडणवीसांनी प्रीतम मुंडेंना शुभेच्छा देताना मोदी फॉर्म्युल्यानुसार 'गॅरंटी' दिल्यानं समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. याला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ), प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी मंत्री रावसाहेब दानवेंनी आपल्या निवासस्थानी महाराष्ट्रातील नेत्यांना रात्रीचे जेवण दिले. योगायोगाने प्रीतम मुंडेंचा वाढदिवस असल्याने या ठिकाणी छोटेखानी अभीष्टचिंतन सोहळाही पार पडला.

cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danve
Loksabha Election 2024 : ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; ठाण्यासह 18 लोकसभेच्या मतदारसंघांत निवडणूक लढविणार..!

तेव्हा शुभेच्छा देताना फडणवीसांनी विनोदी सुरुवात करत 'प्रीतम मुंडेंचा 21 वा वाढदिवस आहे’ असं म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर, 'तसा 16 वाच वाढदिवस आहे. पण, लोकसभा लढविल्यानं 25 वा म्हणू', असे विनोद फडणवीसांनी केले. त्यानंतर "आजचे जेवण रावसाहेब दानवेंनी दिले असले, तरी पुढच्या वाढदिवसाला आपल्या सर्वांना प्रीतम मुंडे जेवण देतील, त्याची 'गॅरंटी' माझी आहे," असं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे प्रीतम मुंडेंच्या समर्थकांना त्यांच्या लोकसभा उमेदवारीची 'गॅरंटी' पक्की झाली आहे.

cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danve
Manoj Jarange Patil : "...अन्यथा पश्चाताप शब्दाची व्याख्या बदलावी लागेल," जरांगेंचा सरकारला थेट इशारा

2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी संसदेत पोहाेचल्या. 2019 मध्येदेखील त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळविला. मात्र, आता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा जिल्ह्यात आणि विशेषत: परळीत पेच असेल. ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार या फॉर्म्युल्यानुसार मंत्री धनंजय मुंडेंना परळीची जागा मिळेल. त्यामुळे पंकजा मुंडेंचे काय? असा पेच निर्माण झाला आहे. राज्यसभेच्या उमेदवारही निश्चित झाल्या आहेत. त्यातही चर्चेत आलेल्या पंकजा मुंडेंचे पुन्हा एकदा नाव टळले. त्यामुळे पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे आडाखे बांधले जात असतानाच फडणवीसांच्या गॅरंटीमुळे प्रीतम मुंडे समर्थकांची गॅरंटी पक्की झाली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

cpritam munde pankaja munde devendra fadnavis raosaheb danve
Loksabha Election 2024 : धुळ्यात 'एमआयएम'ची चाचपणी; भाजपसाठी गुड न्यूज तर काँग्रेसला धोक्याचा इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com