Loksabha Election 2024 : धुळ्यात 'एमआयएम'ची चाचपणी; भाजपसाठी गुड न्यूज तर काँग्रेसला धोक्याचा इशारा...

Dhule Constituency : लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देण्याची शक्यता. मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय.
BJP, AIMIM, Congress
BJP, AIMIM, CongressSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघात 'एमआयएम'ने देखील चाचणी सुरू केली आहे. हक्काच्या मतांना शेज लावण्याचा प्रकार असल्याने काँग्रेसला हा धोक्याचा इशारा मिळाला आहे. यावर काँग्रेस मधून काय उपाययोजना केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षासाठी ही गुड न्यूज आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाने उमेदवारीसाठी चाचणी सुरू केली आहे. या मतदारसंघात मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथे मौलाना मुक्ती (मालेगाव) आणि फारुख शाह (धुळे) हे एमआयएमचे दोन आमदार देखील आहेत. त्यामुळे या पक्षाला येथे यश मिळेल असा प्रयत्न या पक्षाचे काही कार्यकर्ते करीत आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी हे याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP, AIMIM, Congress
EWS Reservation News : EWS चा फायदा फक्त खुल्या वर्गाला देणे अन्यायकारक; हायकोर्टाची सरकारला नोटीस

धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला अनुकूल असलेला मतदारसंघ असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्येकवेळी येथे काँग्रेसचा पराभव होतो. त्याला विविध कारणे आहेत. मालेगाव शहरातून सातत्याने भाजपच्या व्यूहरचनेद्वारे अल्पसंख्यांक समाजाचा एक उमेदवार उभा राहत असतो. त्याला काही हजार मते मिळतात. त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होतो. ही परंपरा यंदाही सुरू राहील असे संकेत एमआयएमने दिले आहेत.

यंदा काँग्रेस पक्षाने धुळे मतदारसंघ विचारात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठक देखील शहरातच घेतली होती. या मतदारसंघातून मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे, धुळ्याचे अध्यक्ष श्याम सनेर आणि निवृत्त पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान अशी तीन नावे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. यातील तीनही उमेदवार भाजपशी लढा देतील एवढे तुल्यबळ नसल्याची चर्चा असल्याने काँग्रेस अन्य उमेदवारांचा देखील शोध घेत आहे. अशा स्थितीत एमआयएम हा पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

ही सर्व राजकीय स्थिती भाजपला निवडणुकीच्या तोंडावर अनुकूल वातावरण निर्मिती करणारी आहे. येथून सध्या भारतीय जनता पक्षाकडे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिखावकर आणि धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते असे तीन उमेदवार प्रामुख्याने चर्चेत आहेत. येथून भाजपकडे उमेदवारीसाठी चुरशीचे वातावरण आहे. एमआयएमच्या निर्णयामुळे ही चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(Edited by Amol Sutar)

BJP, AIMIM, Congress
Nanded BJP News : अशोक चव्हाणांना भाजपने स्वीकारले, चिखलीकर मनाने स्वीकारणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com