Beed News : प्रवासाची दगदग व उन्हाचा तडाखा यामुळे भाजपच्या नेत्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना जाहीर कार्यक्रमातच भोवळ आल्याची घटना गुरुवारी माजलगाव तालुक्यातील संगम येथे घडली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नामाचे प्रवेशद्वार लोकार्पण करण्यासाठी डॉ. मुंडे आल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना व्यासपीठावर अचानक भोवळ आली. यामुळे त्या उठून पाठीमागच्या खुर्चीवर बसल्या. (Latest Marathi News)
गुरुवारी सकाळी भाजपचे नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत अहमदगनर - बीड - परळी लोहमार्गाच्या कामाचा आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी डॉ. मुंडे परळीहून बीडला (Beed) आल्या होत्या. त्यानंतर आढावा बैठक व पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या पुन्हा दिंद्रूड (ता. माजलगाव) येथे गेल्या. तेथील काही खासगी कार्यक्रमांना हजेरी लावून त्या संगमच्या कार्यक्रमाला गेल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी दुपारची वेळ झाली होती. प्रवासाची दगदग आणि उन्हाचा तडाखा यामुळे त्यांना भोवळ आली. महिला कार्यकर्त्यांनी त्यांना धरून त्यांच्या वाहनापर्यंत नेले. तेथून त्यांना तातडीने परळी येथील निवासस्थानी नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.