Maharashtra Political News : तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या निवडणूकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निरीक्षक व पक्षाचे स्टर प्रचारक आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियांका गांधी तेलंगणातील प्रचारासाठी विमानाने आज नांदेडला आल्या होत्या. (Priyanka Gandhi News) विमानतळावर अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर हेलिकाॅप्टरने तेलंगणातील प्रचारासाठी त्या गेल्या. यावेळी हेलिकाॅप्टरमध्ये त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही होते.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पक्षाने देशपातळीवर महत्वाच्या असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती करुन आधीच `लिफ्ट` दिली आहे. आता राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी अशोक चव्हाणांना 'एअरलिफ्ट' दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. (Maharashtra) दिल्लीत चव्हाणांचे राजकीय वजन वाढल्याचे यावरून दिसून येत असल्याचेही बोलले जाते. काँग्रेस पक्षासाठी चव्हाण कुटुबीयांचे गेल्या अनेक वर्षांपासून योगदान राहिले आहे.
काँग्रेसने दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांना राज्यात दोनवेळा मुख्यमंत्रिपद व केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री केले होते. तर अशोक चव्हाण हे दोनवेळा मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत होते. (Congress) काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या कुटुंबामध्ये चव्हाण कुटुंबाचे नाव अग्रस्थानी आहे. मध्यंतरीच्या काळात अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण अशोक चव्हाण यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण काँग्रेस मध्येच राहणार हे वेळोवेळी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण यांना पक्षाने देशपातळीवर राजकारणात सक्रिय करुन घेण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य केले. या नियुक्तीनंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. या राज्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तेलंगणा राज्यातील खानापूर व असिफाबाद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्या विशेष विमानाने नांदेडला आल्यावर त्यांचे माजीमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन आण्णा हंबर्डे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी विमानतळावर स्वागत केले. प्रियांका गांधी नांदेडहून हेलिकाॅप्टरने सभेसाठी रवाना झाल्या तेव्हा त्यांच्यासोबत अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे हेही होते. या दोन्ही सभेला अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. सभा संपल्यानंतर प्रियांका गांधी नांदेडला येऊन विमानाने दिल्लीला रवाना झाल्या.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.