Pune Hit And Run Case : हॉटेलमध्ये लपून बसलेल्या विशाल अगरवालला पकडण्यासाठी पोलिसांनी 'असा' रचला मास्टर प्लॅन!

Vishal Agarwal Arrest : ब्रह्मा ग्रुपचे विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर भागात दोघांना उडविले.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : पुण्यातील कल्याणीनगर येथे आलिशान कारच्या अल्पवयीन चालकाने नशेत दोन जणांना चिरडले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह पुणेकरांनीही वातावरण तापवलं आहे.

या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे. फडणवीसांनी तर चक्क पुणे पोलीस आयुक्तालयाला अचानक भेट देत या प्रकरणी पत्रकार परिषदही घेतली. तसेच या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा शब्दही दिला.

तर दुसरीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या कारचालक मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अगरवाल (Vishal Agarwal) गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने अगरवालला स्टेशन रोडवरील ‘जेएम प्लाझा’या हॉटेलमधून ताब्यात घेतले, तर त्याचा चालक आणि आणखी एकाला नारळीबाग येथील ‘जेपी इंटरनॅशनल’या हॉटेलमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी अतिशय शिताफीने त्यांना बेड्या ठोकल्या.

Pune Hit And Run Case
Medha Kulkarni News : 'होर्डिंग'प्रकरणात राजेंद्र भोसलेंच्या कारभारावर मेधा कुलकर्णी हसल्या अन् भडकल्याही !

अग्रवालच्या कारचा जीपीएस ट्रॅकिंगवरुन माग काढत मंगळवारी (ता.21) पहाटे पाच वाजताही कारवाई करण्यात आली. तीनही संशयित आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. ब्रह्मा ग्रुपचे विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर भागात दोघांना उडविले. या अपघातात अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी विशाल अगरवालसह त्याच्या अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर या चौघांविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच विशाल अगरवाल सोमवारी सायंकाळी कार घेऊन फरार झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तो छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती पुणे पोलिसांनी संभाजीनगरच्या गुन्हे शाखेला दिली होती. पुणे पोलिसांनी अगरवालच्या कारच्या जीपीएस ट्रॅकरचा माग काढला होता. ही कार नारळीबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. पुणे पोलिसांचे एक पथक शहराकडे रवाना झाले होते. त्यापूर्वी त्यांनी शहर गुन्हे शाखेला या कारचा क्रमांक आणि लोकेशन पाठवले होते.

या माहितीवरुन शहर गुन्हे शाखेने नारळीबाग येथील जे पी. इंटरनॅशनल हॉटेल गाठले. येथून त्याचा मित्र राकेश भास्कर पौडवाल (वय 51, रा. नटराज रेसिन्डेसी, चव्हाणनगर, धनकवाडी, पुणे) आणि चालक चत्रभूज बाबासाहेब डोळस (वय 34, रा. गुंडी गाव, ता. सेलू, जि.परभणी, ह. मु. वडगाव शेरी, पुणे) यांना ताब्यात घेतले.

चालकाने मालक अगरवाल याला रेल्वे स्टेशन रोडवर आरटीओ कार्यालयाजवळील जेएम प्लाझा येथे सोडल्याची माहिती दिली. या हॉटेलवरून विशाल सुरेंद्र अगरवाल (वय 50,रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) याला ताब्यात घेतले. या तिन्ही आरोपींना पुणे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pune Hit And Run Case
Medha Kulkarni News : 'होर्डिंग'प्रकरणात राजेंद्र भोसलेंच्या कारभारावर मेधा कुलकर्णी हसल्या अन् भडकल्याही !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com