Medha Kulkarni News : 'होर्डिंग'प्रकरणात राजेंद्र भोसलेंच्या कारभारावर मेधा कुलकर्णी हसल्या अन् भडकल्याही !

Pune Illegal Hoardings : होर्डिंगसंबंधितीत महापालिकेचे धोरण, त्याबाबतची उदासिनता, बेकायदा होर्डिंगवरुन होणारी कारवाई आणि त्यांचे आकडे पाहून खासदार कुलकर्णी चांगल्याच भडल्या. त्यांनी आयुक्त भोसलेंना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले आहे.
Medha Kulkarni
Medha KulkarniSarkarnama

Pune Political News : दारुच्या नशेत ड्रायव्हिंग Pune hit and run करून दोघांना चिरडणाऱ्याविरोधात आक्रमक होऊन कठोर कारवाईच्या मागणीसाठी पुणेकर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या डोक्यावर बसले आहेत. अशातच भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पालिका हद्दीतील होर्डिंग कोसळण्याच्या मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. होर्डिंग उभारणीचे नियम शिकवून खासदार डॉ. कुलकर्णींनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कारभारावर एक प्रकारे बोट ठेवत ताशेरे ओढले आहेत.

महापालिकेच्या हद्दीत किती बेकायदा होर्डिंग आहेत, त्यावर कधी कारवाई केली असे अनेक मुद्द्यांवर कुलकर्णींनी Medha Kulkarni भोसलेंना ढीगभर प्रश्न विचारले आहेत. त्याआधीचा महापालिकेचा खुलासा आयुक्तांपुढे मांडून कुलकर्णी आताच्या कारभारावर हसल्या आणि क्षणताच भडकल्याही. काही वर्षांपूर्वी मंगळवार पेठेतील घटनेनंतर पालिकेकडून दाखवलेले आकडे आताही मांडले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत ही बाब हस्यास्पद असल्याचा टोलाही लगावाला.

होर्डिंगसंबंधितीत महापालिकेचे धोरण, त्याबाबतची उदासिनता, बेकायदा होर्डिंगवरुन होणारी कारवाई आणि त्यांचे आकडे पाहून खासदार कुलकर्णी चांगल्याच भडल्या. होर्डिंग्सबाबतच्या महापालिकेच्या कार्यवाहीवरून कुलकर्णींनी आयुक्त भोसलेंना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले आहे.

Medha Kulkarni Letter
Medha Kulkarni LetterSarkarnama

लोकसभेची निवडणूक Lok Sabha Election संपल्यानंतर कुलकर्णी यांनी महापालिकेच्या कारभारात लक्ष घातल्याचे दिसत आहे. एकंदरीच कुलकर्णींची 'बंडखोर स्टाइल' पाहता त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आयुक्त भोसलेंची मोठी डोकेदुखी ठरणार आहे. आता मात्र बेकायदा होर्डिंगसारख्या गंभीर विषयात कुलकर्णी या केवळ पत्रकबाजी आणि प्रश्नांचा ढीग मांडणार की महापालिकेला सरळ करणार, हे पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Medha Kulkarni
Sanjay Jadhav News : '...म्हणून मला जातीयवादाचा फायदा झाला', ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्याने नवा वाद!

दरम्यान, काही वर्षांपूर्वी पुण्यातील मंगळवार पेठेत होर्डिंग कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. आता मु्ंबईतील घाटकोपर येतील बेकायदा होर्डिंग पडून 16 जणांचा जीव गेला. त्यानंतर पुणे-सोलापूर रोडवरील उरूळी कांचन येथेही भले मोठे होर्डिंग पडले. या घटनांमुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंगच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातून ही चर्चा मागे पडली होती. आता हाच मुद्दा भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णींनी उकरून काढत महापालिकेला धारेवर धरल्याचे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Medha Kulkarni
Pune Hit and Run Case : 'कोझीं' आणि 'ब्लॅक'चे मालक पोलिस कोठडीत रवाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com