भाजप जिल्ह्याध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा ; जुगार अड्ड्यावर छापा

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rajendra Muske

Rajendra Muske

sarkarnama

Published on
Updated on

बीड : भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या जागेत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या प्रकरणी भाजप जिल्ह्याध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील तीन जण फरारी असून त्यांचा शोध बीड पोलिस घेत आहेत.

बीड शहरालगत भाजपच्या (bjp) जिल्हाध्यक्षांच्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर, सहाय्यक पोलीस अधीक्षकांसह टीमने रात्री छापा टाकला आहे. यावेळी ४८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार , मोबाईल असा जवळपास 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ४८ जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Muske) यांचाही आरोपीत समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

<div class="paragraphs"><p>Rajendra Muske</p></div>
राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं ; अजितदादांनी विरोधकांना सुनावलं

Dhiraj Deshmukh:केंद्राने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट'राज्यात लागू करू नका

लातूर : केंद्र सरकारने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट' राज्य सरकारने लागू करु नये, अशी मागणी 'लातूर ग्रामीण'चे आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh)यांनी सभागृहात केली. महाविकास आघाडी सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. (Latur) या प्रश्नाबाबतही सरकारने शेतकऱ्यांच्या (Marathwada) बाजूने उभे रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारने सोयापेंडवर 'स्टॉक लिमिट' लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सोयाबीनचे भाव पुन्हा पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर धिरज देशमुख यांनी अधिवेशनात या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com