Latur Political News : रेल्वे कोच फॅक्टरीचा कार्यक्रम संभाजी पाटलांकडून 'हायजॅक' ; अभिमन्यू पवार, कराडांनी फिरवली पाठ

Railway Coach Factory Programme : एकूणच रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खासदार सुधाकर श्रृंगारे आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हायजॅक केला. त्यामुळे...
Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे उदघाटन केले. परंतु माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी आजचा कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे भाजपच्याच आमदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. 2017-18 मध्ये जेव्हा लातूर येथे रेल्वे कोच बनवण्याच्या कारखान्याला मंजुरी मिळाली तेव्हा राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या उभारणीसाठी करावा लागणार पाठपुरावा आणि ती लातूरमध्येच व्हावी यासाठी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निलंगेकरांनी बरेच प्रयत्न केले. त्यामुळे सहाजिकच या कारखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमावरही त्यांचीच छाप होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ठरले तेव्हा निलंगेकरांनी समाज माध्यमावरून याची माहिती देत कार्यक्रमाला येण्याचे आवाहन लातूरकरांना केले होते.

Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur
Vasant More News : 'काही लोक पक्ष संपवत आहेत', वसंत मोरे नेमकं कुणाबद्दल म्हणाले?

त्यानंतर काही वेळाने औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही याचा कार्यक्रमाची माहिती देत लातूरकरांचे अभिनंदन करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि विद्यमान अश्विनी कुमार यांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे या निमित्ताने लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे हेही संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत दिसले. मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनीही प्रसिद्धी पत्रक काढत या कार्यक्रमाची माहिती माध्यमांपर्यंत पोहचवली.

एकूणच रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खासदार सुधाकर श्रृंगारे आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी हायजॅक केला. त्यामुळे भाजपच्या आमदार अभिमन्यू पवार, रमेश कराड यांच्यासह पक्षाच्या अनेक स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खरतंर चार वर्ष रखडलेल्या या रेल्वे कोच कारखान्याच्या उद्घाटनाचा घाट निवडणुकीच्या तोंडावर घालून राजकीय फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, त्याऐवजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजीच चव्हाट्यावर आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपधील हे निरुत्साहाचे वातावरण आणि निलंगेकर-श्रृंगारे वगळता इतरांनी कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ पाहता वरिष्ठांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले जाऊ शकते. राज्यातील महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. लातूरचे विद्यमान खासदार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळणार की नाही? हेही अजून स्पष्ट नाही. पण रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटन निमित्ताने बऱ्याच ब्रेकनंतर खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shringare) आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर एकत्र दिसले. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur
Mp Sudhakr Shringare News : विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूरची प्रगती खुंटली..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com