Aurangabad News : तब्बल सात वर्षांनंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतली. मराठवाडा मुक्ती संग्रामचे अमृतमहोत्सवी वर्षाचा मुहूर्त त्यासाठी निवडला. (Cabinet Meeting News) मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांचे निर्णय घेतले. नदीजोड प्रकल्पांसाठी स्वतंत्रपणे १४ हजार कोटी अशा एकूण ५९ हजार कोटींच्या योजनांचा वर्षाव पाऊस लांबलेल्या मराठवाड्यावर करण्यात आला.
२०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या ४९ हजार कोटींच्या घोषणांचे काय? असा सवाल विरोधकांनी केला. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या स्टाइलने प्रत्युत्तर दिले. आता (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली आहे. त्या प्रत्यक्षात किती येतात? आणि त्यातून मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष खरंच भरून निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. (Marathwada) केलेल्या घोषणा आणि निर्णयांची अंमलबजावणी याची सांगड हे ट्रिपल इंजिन सरकार या वर्षभरात घालण्यात यशस्वी होते का? की पुन्हा पुढच्यावेळी जेव्हा केव्हा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होईल, तेव्हा आज केलेल्या घोषणांचा जाब विरोधक पुन्हा सत्ताधाऱ्यांना विचारतील, हे पाहवे लागणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत.
मराठवाड्यासाठी झाले हे निर्णय...
- अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
- छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
- ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
- हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता
- राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटी खर्च
- सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
- समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ.
- राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
परळीत नवे कृषी महाविद्यालय
- सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
- सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
- नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
- जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता
- गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
- राज्यात `मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण` अभियान राबविणार
- २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.