Raj Thackeray News : निवडणूक आयोगाची प्रेस पाहून राज ठाकरे भडकले; म्हणाले, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!

Raj Thackeray Reaction On Election Commission : दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ?
Raj Thackeray React On State Election Commission Press News
Raj Thackeray React On State Election Commission Press NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

  2. ठाकरे म्हणाले, “हा आयोग शंभर टक्के सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आहे आणि निष्पक्ष नाही.”

  3. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर चर्चेला उधाण आले.

MNS News : गेल्या काही दिवसापासून राज्यात दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा गाजतो आहे. विशेषतः महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी या विरोधात रस्त्यावर उतरत आवाज उठवला आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नको, अशी भूमिका घेत मुंबईत सत्याचा मोर्चाही काढण्यात आला. परंतु निवडणूक आयोग काही विरोधकांना जुमानत नाहीये.

आज दुपारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच भडकले आहेत.आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.

प्रत्यक्षात हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? असा सवाल करत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?

Raj Thackeray React On State Election Commission Press News
Election Commission: निवडणूक आयोगाचा एकच निर्णय अन् राज ठाकरेंसह 'मविआ'नं पूर्ण ताकदीनिशी टाकलेला डाव फसला

महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल, असे आवाहन करतानाच बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करणारी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. दुबार मतदार नोंदणीच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आधी असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, असा दावा करणारे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते यांनीही मतदार यादीत दुबार नोंदणी झाल्याचे मान्य करताना दिसत आहेत.

Raj Thackeray React On State Election Commission Press News
Raj Thackeray speech : 'लाव रे तो व्हिडीओ'नंतर राज ठाकरेंचा 'काढ रे तो पडदा' : दुबार मतदारांचे आकडे सांगत थेट पुरावाच दिला

हिंदू-मुस्लिम अशी दुबार मतदारांची नावे दाखवून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढल्यानंतर विशेषतः महायुतीतील भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांच्या साथीला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही मैदानात उतरला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांची कोंडी केल्याचे दिसून आले होते.

मतदार याद्या दुरूस्त केल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणूका घेवूनच दाखवा, अशा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. या शिवाय दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फोडून काढा, असे आवाहन त्यांनी मुंबईतील सत्याचा मोर्चामधून केले होते. मात्र निवडणूक आयागाने विरोधकांची दखल न घेता नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीची घोषणा केली आहे.

FAQs

Q1. राज ठाकरे यांनी नेमकं कोणावर टीका केली?
➡️ त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगावर टीका केली.

Q2. टीकेचं कारण काय होतं?
➡️ निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेतील भूमिकेबद्दल राज ठाकरे नाराज होते.

Q3. राज ठाकरे यांनी काय विधान केलं?
➡️ “शंभर टक्के हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले आहेत,” असं त्यांनी म्हटलं.

Q4. या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया कशा आल्या?
➡️ विरोधकांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांचे आरोप फेटाळले.

Q5. निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलं का?
➡️ आयोगाने अधिकृत प्रत्युत्तर अद्याप दिलेले नाही, परंतु आंतरिक चर्चेला सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com