Raj Thackeray speech : 'लाव रे तो व्हिडीओ'नंतर राज ठाकरेंचा 'काढ रे तो पडदा' : दुबार मतदारांचे आकडे सांगत थेट पुरावाच दिला

Raj Thackeray duplicate voters News : लोकसभानिहाय दुबार मतदारांचे आकडे सांगत त्यांनी थेट पुरावाच दिला. त्यामुळे 'लावरे तो व्हिडिओ' प्रमाणेच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या 'काढ रे तो पडदा' या डॉयलॉगची चर्चा रंगली होती.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडी- मनसे-डाव्या पक्षांनी मतचोरीच्या विरोधात एकत्र येत मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चातुन विरोधकांनी पुन्हा एकदा ताकद दाखवून दिली. यावेळी निवडणूक आयोगाच्या कारभाराची पुन्हा एकदा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वाभाडे काढली. यावेळी लोकसभानिहाय दुबार मतदारांचे आकडे सांगत त्यांनी थेट पुरावाच दिला. त्यामुळे 'लावरे तो व्हिडिओ' प्रमाणेच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या 'काढ रे तो पडदा' या डॉयलॉगची चर्चा रंगली होती.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राग आणि ताकद दाखवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी दुबार मतदारांची लोकसभानिहाय यादीच राज जाहीर केली. त्यासोबतच मतदार याद्यामध्ये अनेक दुबार मतदार असल्याचे राज ठाकरे यांनी पुराव्यासह दाखवून दिले. यावेळी त्यांनी मतदार यादीतील दुबार नावांची यादीचा पुरावा दाखवत 'लावरे तो व्हिडिओ' प्रमाणेच पुन्हा एकदा राज ठाकरेंनी 'काढ रे तो पडदा' या डॉयलॉग म्हणत पुरावेच सादर केले आहेत.

Raj Thackeray
Uddhav Thackeray: अमित शाहंना पुन्हा अ‍ॅनाकोंडाची उपमा; शोलेतील डायलॉग सांगत उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

या मोर्चावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील मतदार यादीतील गंभीर अनियमिततांवर प्रकाश टाकला. ठाणे लोकसभा मतदारसंघात 2 लाख 9 हजार 989 दुबार मतदार असल्याचा थेट पुरावा त्यांनी सादर केला. या गोंधळामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आव्हान देत, कोर्टाच्या आदेशाचा हवाला देऊन जानेवारीत निवडणुका घेण्याच्या घाईवर नाराजी व्यक्त केली.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी दादरमधून 10.41 ची लोकल पकडली, तुफान गर्दीतही मिळवली विंडो सीट; इतर नेत्यांचं काय झालं?

पाच वर्षांपासून निवडणुका न झाल्याने आता घाई कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका आमदाराच्या भावाने 20 हजार मते बाहेरून आणल्याचा दावा करणे, मुलीचे वय 114 तर वडिलांचे वय 43 असणे, तसेच नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर किंवा सुलभ शौचालयात मतदार नोंदणी होणे, हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे ठाकरे म्हणाले. मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान करायचे, पण मॅच फिक्स असेल तर मतदाराच्या मताचा अपमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Sharad Pawar unity call : सगळं विसरून एक व्हावं लागेल; हीच ती वेळ; सत्याच्या मोर्चातून पवारांनी उचलला लोकशाही टिकवण्याचा विडा

निवडणूक आयोगाला जर राज्यात येत्या काळात निवडणुका घ्याच्या असतील तर त्यांनी या मतदार यादीतील दुबार नावे काढावीत. ही यादीतील दुबार नावे साफ करूनच निवडणूका घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच घराघरात जाऊन मतदार याद्यांची पाहणी करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी आक्रमकपणे भाषण करताना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

Raj Thackeray
BJP Sujay Vikhe : 'स्थानिक'साठी उमेदवारीचा निकष विखेंनी सांगितला; नेत्यांभोवती पिंगा घालणाऱ्यांच्या पोटात गोळाच आला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com