Raj Thackeray : ठाकरे गटाने सुपारी फेकल्यानंतर राज ठाकरे पोलिसांवर भडकले; म्हणाले...
Maharashtra Political News : बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गाडी अडवून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. तसेच राज ठाकरे चले जाव, अशा घोषणाही केल्या. या प्रकरणी पोलिसांनी सुपारी फेकणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
या आंदोलनप्रकरणी राज ठाकरे यांनी पोलिसांना फैलावर घेतल्याची माहिती आहे. आंदोलन होणार असल्याची माहिती पोलिसांनी नव्हती का. तुमच्याकडे इंटेलिजन्स नाही का, असा खडा सवाल ठाकरेंनी बीड पोलिस अधिक्षकांना केला आहेत.
सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यातच सोलापूर येथे राज ठकारे यांनी आपल्या प्रगत राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे विधान केले. त्यानंतर धाराशीवमध्ये Raj Thackeray राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. आता ते आरक्षणाचे केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात आले असता ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या गाडीपुढे सुपाऱ्या टाकून आंदोलन केले.
या प्रकारानंतर राज ठाकरेंनी बीडचे पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलिस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना काही प्रश्न केले. ठाकरे गट किंवा मराठा आंदोलकांच्या भूमिकेबाबत तुम्हाला माहिती नव्हती का? आपले इंटेलिजन्स नाही का? असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच जे नको घडायला होते ते झाले, मात्र यापुढे काळजी घ्यावी, अशी सूचनाही ठाकरेंनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकून आंदोलन करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज ठाकरेंसमोर गोंधळ घातल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसेचे संदिप देशपांडे Sandeep Deshpande यांनी सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार, असा इशारा दिला आहे. तर त्याला ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनीही सुरुवात बीडमध्ये केली असून शेवट मुंबईत करणार, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यात मनसे विरुद्ध ठाकरे गट असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.