Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; मनसेची ठाकरे गटाला वॉर्निंग!

Shivsena UBT Vs MNS : बीडमध्ये राज ठाकरेंची गाडी अडवून सुपारी फेकल्याने राज्यभर ठाकरे गट विरुद्ध मनसे असा नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : बीडमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची गाडी अडवून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपाऱ्या फेकल्या. तसेच सुपारीबाज राज ठाकरे चले जाव, एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही दिल्या.

यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकाराने राज्यभरातील मनसैनिक चिडले आहेत. त्यांनी सुरूवात तुम्ही केली, याचा शेवट आम्ही करणार असा थेट इशाराच ठाकरे गटाला दिला आहे.

या प्रकाराबाबत बोलताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी राज ठाकरेंवर Raj Thackeray टीका केली आहे. वरेकर म्हणाले, राज ठाकरे लोकसभेत नरेंद्र मोदी, अमित शाह यांची सुपारी घेऊन आले होते. आता विधानसभा निवडणुकीत ते कुणाची सुपारी घेऊन आले आहेत? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

त्यांचे जिल्ह्यात काहीही ताकद आणि कामही नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे की कुणाची सुपारी घेऊन आले आहेत. जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. ते मात्र आरक्षणालाही विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांनी येथून गेले पाहिजे. राज ठाकरे सुपारीखोर चले जाव, असा नाराही वरेकर यांनी दिला.

राज ठाकरेंची गाडी अडवून घोषणा दिल्याने मनसेचे नेते चांगलेच चिडले आहेत. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनाच इशारा दिला आहे. काळे म्हणाले, बीडमध्ये ठाकरे गटाच्या काही टिनपाट कार्यकर्त्यांनी राज ठाकेरंच्या गाडीसमोर गोंधळ घातला. बीडमधील मनसैनिकांनी त्यांना चोप दिला आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंची गाडी अडवली अन् सुपाऱ्याही फेकल्या; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

आता ठाकरे गटाला मस्ती आली आहे. आमच्याकडे पान आणि चुना तयार आहे. राज ठाकरेंनी आदेश द्यावा, ठाकरेंना राज्यात फिरू देणार नाही. आपले घर काचेचे आहे हे त्यांनी विसरू नये. आदानीच्या मोर्चाचे काय झाले? तुम्ही काय पान, सुपारी, चुना सगळंच खाल्लं का? आता तुम्ही केलेल्या गोष्टीचे मनसैनिक व्याजासह परतफेड करतील, असा इशाराच काळेंनी दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. देशपांडे यांनी, उबाठा... राज्यातील सर्व मनसैनिकांच्या वतीने सांगतोय, की सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे, शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यानंतर ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Congress Breaking News : 'काँग्रेसच्या सर्व खासदारांना अपात्र करा,त्यांचं चिन्हही...'; कोर्टात याचिका, काय आहे कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com