Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray News : स्वबळाच्या घोषणेनंतर राज ठाकरे करणार मराठवाड्यात चाचपणी; विधानसभानिहाय घेणार ताकदीचा अंदाज

MNS Political News : राज ठाकरे सोमवारपासून मराठवाड्याचा दौरा करीत आहेत. हा त्यांचा दौरा १३ ऑगस्ट्पर्यंत चालणार असून यामध्ये विधानसभानिहाय सर्वच मतदारसंघाची चाचपणी करार आहेत. उद्या धाराशिवपासून दौरा सुरु होत आहे.
Published on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मनसेने देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. स्वबळाच्या घोषणेनंतर राज ठाकरे सोमवारपासून मराठवाड्याचा दौरा करीत आहेत. हा त्यांचा दौरा १३ ऑगस्ट्पर्यंत चालणार असून यामध्ये विधानसभानिहाय सर्वच मतदारसंघाची चाचपणी करार आहेत. उद्या धाराशिवपासून दौरा सुरु होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मात्र राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात स्वबळावर लढणार असताना ते ताकदीचा अंदाज घेणार आहेत. (Raj Thackeray News)

विधानसभा निवडणुका मनसे (Mns News) स्वबळावर लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर जिल्हानिहाय नियोजनाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील मतदारसंघनिहाय ते आपल्या ताकदीचा अंदाज राज ठाकरे यावेळी घेणार आहेत.

राज ठाकरे मराठवाडा दौरा करण्याआधी रविवारी सोलापुरात होते. सोलापुरात त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. राज ठाकरे सोमवारपासून 13 ऑगस्टपर्यंत ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. रविवारी सोलापुरात मुक्कामी आहेत. उद्या इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

Raj Thackeray
Congress News : काँग्रेसच्या बैठकीला बोलावले जात नाही; हायकमांडकडे आमदार झिशान सिद्दिकी करणार तक्रार

मनसे विधानसभेच्या स्वबळावर 225- 250 जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या दौरा करत आहेत. त्यामुळे या मराठवाडा दौऱ्यावर असताना ते या निवडणुकीचे निमिताने बळ वाढवण्याची संधी त्यांना आहे.

त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते काही मतदारसंघात आणखी काही इच्छुक उमेदवार पक्षामध्ये येऊ शकतात का याचा अंदाज ते घेणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या या दौऱ्याचा फायदा आगामी काळात पक्ष वाढवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना घरातूनच धक्का बसण्याची शक्यता; नातलग विधानसभा निवडणूक लढणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com