Maharashtra Assembly Election 2024 : आपण सर्वांनी आज पर्यंत माझ्यावरती भरघोस प्रेम केल आणि तसाच जीव लावला आहे. हीच आपुलकीची देवाणघेवाण मायबाप जनता आणि तुमचा सेवेकरी म्हणून मी आपला आमदार हे नात आपल्याला या पुढेही कायम ठेवणार आहे. मतदारसंघाला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे आणि या पुढेही करत राहणार असल्याचे आश्वासन घनसावंगी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी मतदारांना दिले.
मतदारसंघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मला आशिर्वाद द्या, असे आवाहन टोपे यांनी केले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर प्रचार सूरू आहे. दरम्यान घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अंबड तालुक्यातील गोंदी, शहागड, साष्टपिंपळगाव, धाकलगाव या चार जिल्हा परीषद गटात प्रचार दौऱ्यात त्यांनी नागरीकांशी संवाद साधला.
भेटीगाठी आणि कॉर्नर सभा घेऊन मतदारांना पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती टोपे देत आहेत. भविष्यात मतदारसंघात नवे काय करणार? याचे व्हिजन सांगून मतदारसंघाचा सेवेकरी म्हणून काम करण्याची पुन्हा संधी द्या, अशी साद टोपे घालतांना दिसत आहेत. घनसावंगी विधानसभा मतदार संघामधून आपल्या सर्वांच्या साथीने येणाऱ्या निवडणुकीसाठी पुन्हा आशिर्वाद मागायला आलो आहे.
आपण सर्वांनी आजपर्यंत माझ्यावर भरपूर प्रेम केले, जीव लावला. हीच आपुलकीची देवाणघेवाण मायबाप जनता आणि तुमचा सेवेकरी म्हणून मी आपला आमदार हे नात आपल्याला या पुढेही कायम ठेवायचे आहे. (NCP) मतदारसंघाला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे आणि या पुढेही करत राहणार आहे. आगामी काळातही आपल्या मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत.
राज्यात आपल्या विचारांचे व विकास कामाला गती देणारे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन टोपे यांनी केले. आपण घनसावंगी मतदार संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. विकासाचा ध्यास अंगी बाळगत दिवसरात्र जनतेच्या आपण सोबत असल्याने जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी, महिला, तरुण युवक, बेरोजगार, विद्यार्थी, निराधार,दीव्यांग यासह समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांची आपल्याला जान आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, सिंचन,दळणवळणासाठी रस्ते,वीज यासह आदी विकास कामासाठी सतत शासन दरबारी पाठपुरावा करत विकास कामासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे विकास कामावर आपण मला पुन्हा सेवेची संधी द्या, असे टोपे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.