Rajesh Tope News : जरांगेंच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांची गर्दी; टोपेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले...

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मराठवाड्यातील 46 विधानसभेच्या जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील 46 विधानसभेच्या जागांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. खुद्द शरद पवारांनी उपस्थित रहात तब्बल 150 ते 175 जणांची मत जाणून घेतली. या मुलाखतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली.

राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले, आज दिवसभर मराठवाड्यातील विधानसभा जागांच्या बाबत बैठका झाल्या आहेत. मराठवाडा विभागातील सर्व इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आणि चर्चा झाली आहे. प्रत्येक मतदार संघात अनेक लोक इच्छूक आहेत. सर्व मतदार संघाची सविस्तर चर्चा झाली.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून अद्याप जागावाटप झालेले नाही. माञ ज्यांनी आर्ज केलें आहेत त्या सगळया लोकांच्या मुलाखती झाल्या आहेत.

Rajesh Tope
Sharad Pawar : मनोज जरागेंचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात शरद पवारांची खास रणनीती

इच्छुकांनी निवडून कसे येणार याबद्दल महिती दिली. या सगळया जागेबाबत ७, ८ आणि ९ तारखेला निर्णय होणार असून ९ तारखेला महविकस आघाडीचं जागावाटप पूर्ण होइल. १२ तारखेला आचार संहिता लागण्याची शक्यता आहे, अशी अशी माहिती टोपे यांनी दिली.

टोपे पुढे म्हणाले, बीड(Beed) जिल्ह्यामध्ये ५७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. निवडून येण्याची पात्रता याच निकषावर जागावाटप होईल. महविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर हेच महत्वाचं निवडून येण्याचा निकष पाहावा लागेल. सर्व समतोल साधत उमेदवार घोषित होतील. सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं ऐकून घेवू सर्वांना न्याय देवू असं टोपे म्हणाले.

Rajesh Tope
Raj Thackearay News : राज ठाकरेंचा दुसरा मराठवाडा दौरा, पण संभाजीनगरातील उमेदवारांबद्दलचा सस्पेंस कायम..

शरद पवारांच्या(Sharad Pawar) पक्षामध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, शरद पवारांना अनेक विद्यमान आमदार भेटत आहेत. पण सगळया गोष्टींचा विचार करुन कोणाला पक्ष प्रवेश द्यायचा ते फायनल होइल. मराठावाड्यातील बहुतांश जागांवर मनोज जरांगे पाटील प्रभावी असतील आज देखील लोकांनी बोलून दाखवलं. आमच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होईल? कुणाला कशी जागा आणि कुठली द्यायची याचा निर्णय राजकीय निकष लावून घेवू असे देखील, टोपे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com