Rajesh Vitekar News : राजेश विटेकरांचा दुर्राणींना धक्का; संधी मिळताच केला करेक्ट कार्यक्रम

Political News : विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राजेश विटेकरांनी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सर्व सूत्रे हातात घेतली.
Rajesh Vitekar, Babajani Durrani
Rajesh Vitekar, Babajani DurraniSarkarnama
Published on
Updated on

Parabhni News : लोकसभा निवडणुकीपासूनच आमदार राजेश विटकर व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यापासूनच दोघात मतभेद होते. लोकसभा निवडणुकीपासूनच दुर्राणींना विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळणार नसल्याचे लक्षात आले होते. त्यामुळेच 27 जुलैला दुर्राणी यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्याच वेळी विटेकरांनी संधी मिळताच करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राजेश विटेकरांनी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाची सर्व सूत्रे हातात घेतली. त्यानंतर लगेचच पाथरी तालुका संजय गांधी निराधार समिती बरखास्त करीत अध्यक्ष असलेल्या बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांची उचलबांगडी केली होती. त्यांच्या जागी शिवसेना शिंदे गटाचे आसेफ खान यांची वर्णी लावली. त्यामुळे दुर्राणी यांना मोठा धक्का बसला आहे. (Rajesh Vitekar News)

लोकसभा निवडणुकीनंतर दुर्राणी यांनी विधानपरिषद निवडणुकीत राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून या सर्व प्रक्रियेपासून ते दूर राहिले होते. त्यानंतर आमदारकीचा कार्यकाळ संपण्यास एक दिवस शिल्लक असताना त्यांनी 27 जुलैला शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते.

त्यानंतरच आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात दुर्राणींचा संधी मिळताच करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले होते. त्याची पहिली झलक आता पाहायला मिळाली असून त्यानुसार दुर्राणींना संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हटवले.

Rajesh Vitekar, Babajani Durrani
Praveen Mane : अजितदादांना पुण्यातच मोठा धक्का; इंदापूरचा युवा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार

30 जुलैला पालकमंत्री संजय बनसोडे यांनी नव्याने समिती नेमली आहे. एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी पूर्वीची समिती रद्द करून नवीन नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यातून विटेकर यांनी माजी आमदार दुर्राणींना धक्का दिला आहे.

राजेश विटेकर यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री संजय बनसोडे यांनी पाथरी तालुका संजय गांधी निराधार समितीवर शिवसेना शिंदे गटाचे आसेफ खान यांची वर्णी लावली. महायुतीच्या सरकारने आमदार असताना बाबाजानी दुर्राणी यांची पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या शिफारसीवरून 29 फेब्रुवारी 2024 ला पाथरी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती.

दरम्यान, येत्या काळात परभणी जिल्ह्यातील राजकारण यावरून चांगलेच तापण्याची शक्यता आहे. या निवडीनंतर येत्या काळात आता राजेश विटेकर आणि दुर्राणी यांच्यातील संघर्ष पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे

Rajesh Vitekar, Babajani Durrani
Maharashtra Police News : मोठा निर्णय! वरिष्ठांना मर्जीतील पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com