Praveen Mane : अजितदादांना पुण्यातच मोठा धक्का; इंदापूरचा युवा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार

Indapur Politics : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून प्रवीण माने यांनी काम पाहिले आहे. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
Praveen Mane
Praveen ManeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 02 August : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. राज्यातील महत्वाचे नेते साथ सोडून जात असताना आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातच अजितदादांना धक्का दिला आहे.

इंदापूरमधील सोनाई परिवाराचे प्रवीण माने हे उद्या (ता. 03 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून प्रवीण माने (Praveen Mane) यांनी काम पाहिले आहे. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश झाल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीत इंदापूरची (Indapur) जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडवून त्या ठिकाणाहून प्रवीण माने यांना उमेदवार दिली जाऊ शकते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते विधानसभेची उमेदवार असू शकतात.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. तसेच, इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठीही प्रवीण माने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

Praveen Mane
Kolhapur Toll : कोल्हापूरचा टोल हे सतेज पाटलांचेच पाप; टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला भाजप नेत्याचा टोला

शरद पवार हे आमच्यासाठी कालही दैवत होते, आज आहेत आणि उद्याही आमच्यासाठी ते दैवत आहेत, असे विधान प्रवीण माने यांनी केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उद्या प्रवीण माने यांचा राष्ट्रचादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत, त्यामुळेच प्रवीण माने यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंदापूरची राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Praveen Mane
Bhaskar Jadhav : फडणवीसांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवली, खराब केली अन्‌ नासवली; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com