Ramdas Athwale News : राऊत जेलमध्ये जावून आलेत, त्यांनी भान ठेवून बोलावे..

RPI (A) : नांदेड हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असून माझे नेतृत्व वाढविण्यामध्ये नांदेडचा सिंहाचा वाटा आहे.
Ramdas Athavale News, Nanded
Ramdas Athavale News, NandedSarkarnama

Nanded : निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. कारण शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना ही आता उद्धव ठाकरे यांची राहिलेली नसून त्यांना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

Ramdas Athavale News, Nanded
Kishori Pednekar : ठाकरेंसोबत म्हणून आमचा छळ, पण आम्ही कफन बांधून उतरलोय..

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोर म्हणणे, हे अत्यंत चुकीचे आहे. राऊत जेलमधून आले आहेत, त्यांनी जरा भान ठेऊन बोलावे. वातावरण गढूळ करू नये, पातळी सोडून नाव ठेवणे योग्य नसल्याचेही आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. दलित पॅंथर स्थापनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त आठवले नांदेडला आले होते.

शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधतांना आठवले म्हणाले, लढवय्या संघटन असलेल्या ऐतिहासिक दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव साजरा होतो आहे, ही आनंदाची बाब आहे. नांदेड हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असून माझे नेतृत्व वाढविण्यामध्ये नांदेडचा सिंहाचा वाटा आहे.

राज्यात भाजप - शिवसेनेला बहुमत असतांना देखील उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी सरकार स्थापन करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. उद्धव ठाकरे आणि वंचितच्या युतीचा काही फरक पडणार नाही, उलट आमचा फायदाच होईल. मुंबईमध्ये आरपीआयची ताकद चांगली असून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी चालू असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com