Chhatrapati Sambhajinagar : शिंदेंच्या आमदाराने पंचायत समितीत घेतली बैठक, जिल्हा परिषद अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश; बोरनारे-गलांडे यांच्यात पुन्हा खडाजंगी!

Ramesh Bornare news : वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी पंचायत समिती सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीवरून वाद निर्माण झाला आहे. सर्व लोकप्रतिनिधींना न बोलावल्याच्या आरोपानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी चौकशीचे आदेश दिले.
MLA Ramesh Bornare Vaijapur Constituency News
MLA Ramesh Bornare Vaijapur Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Ramesh Bornare news : शिवसेनेचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलेली बैठक वादात सापडली आहे. एकाच पक्षाच्या सदस्यांना निमंत्रित केल्याचा आरोप करत इतर पक्षाच्या सदस्यांनी या बैठकीवरच आक्षेप नोंदवला. बोरनारे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक घेतली.

परंतु या बैठकीला एकाच पक्षाच्या सदस्यांना कसे बोलावले? असा आक्षेप घेत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. बैठकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना निमंत्रित न करता एका पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाच बोलावल्याचा आरोप सदस्यांनी केला.

आमदारांना तालुक्यात आढावा बैठक घेण्यास आक्षेप नाही, मात्र ती बैठक लोकहिताची असल्यास सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली असताना त्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही.

तसेच सभागृहात 'आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक' असा फलक लावल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सभागृहाचे सचिव असल्याने बैठकीच्या आयोजनातील प्रोटोकॉलची जबाबदारी त्यांची असल्याचे ठाकरेच्या शिवसेनेचे सदस्य संजय निकम, भाजपचे रतन बत्तीसे यांनी सांगितले.

याप्रकरणी वैजापूरच्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस देऊन आठ दिवसांत खुलासा मागवावा. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याची चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिले.

MLA Ramesh Bornare Vaijapur Constituency News
TMC rebel MPs : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; सायोनी घोष यांचा समावेश असलेल्या 20 बंडखोर खासदारांमध्ये फूट, तिघांचा भाजप प्रवेशास नकार

प्रोटोकॉलनुसार सन्मान देणे आवश्यक..

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनांनाही संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना डावलले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. आम्ही विरोधी पक्षाचे असलो तरी हजारो मतदारांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत, अशा शब्दात डावलेल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षीय राजकारण न करता प्रोटोकॉलनुसार सर्व सदस्यांना सन्मान देणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी अधिकार्‍यांना बजावले.

MLA Ramesh Bornare Vaijapur Constituency News
Chhatrapati Sambhajinagar : वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईविरोधात शिक्षकांचा एल्गार मोर्चा, राज्यभरात काळी फित लावून करणार निषेध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com