Ranajagjitsinh Patil : मराठा आरक्षणासाठी राणा जगजितसिंह मैदानात ; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Marath Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले
Ranajagjitsinha Patil :
Ranajagjitsinha Patil :Facebook @Ranajagjitsinha Patil
Published on
Updated on

Kalamb Political News : मराठा समाजाला "कायमस्वरूपी टिकणारे मराठा आरक्षण' मिळावे, या आग्रही मागणीसाठी शुक्रवारी (ता. २७) तुळजापुरचे आमदार राणाजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर आरक्षणाचा तिढा तातडीने सोडविण्यासाठी आपण समाजासोबत असल्याचा पवित्रा त्यांनी व्यक्त केला आहे.

Ranajagjitsinha Patil :
Uday Samant : उद्योगमंत्र्यांचा कानमंत्र : खरंच राबवायचं असेल बेरोजगारी हटवा; तर तरुणाईनं आता मधाचं गाव वसवा

काय म्हटले आहेत राणा जगजितसिंह पाटील?

"आमदार पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून भूमिका स्पष्ट केली असून, कायमस्वरूपी टिकणारे मराठा आरक्षण' मिळावे, या आग्रही मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील भेट घेण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून, सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी साखळी उपोषण, सर्वपक्षीयांना गावबंदी, रास्ता रोको आदी आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा शांततापूर्ण मार्गाने लढला जात आहे. या विषयाबाबत कायद्यात टिकणारे आरक्षण मिळावे, अशी विनंती या प्रसंगी करण्यात आली.

सरकार या संवेदनशील विषयाबाबत सकारात्मक असून, युद्ध पातळीवर प्रामाणिक, नियोजनबद्ध व शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत बसणारे, टिकणारे आरक्षण देणे हा सरकारचा शब्द आहे असेही त्यांनी विशेषत्वाने सांगितले. सरकार तर्फे आता मा. सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटिव्ह पिटीशन'देखील दाखल करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्र दाखल्यासंदर्भातदेखील शासनातर्फे नेमलेल्या शिंदे समितीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही समिती हैदराबाद येथे जाऊन सक्षम पुरावेदेखील गोळा करणार आहे. हैदराबादमधील निवडणूक प्रक्रियेमुळे अडथळा निर्माण होऊन वेळ लागू नये, यासाठी सरकारकडून अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे, अशीदेखील सकारात्मक चर्चा या वेळी झाली.

आमचादेखील याबाबत व्यक्तिशः पाठपुरावा राहील. माझी समाज बांधवांना विनंती आहे की, सरकार तर्फे आरक्षणासाठी सुरू असलेल्या सकारात्मक प्रक्रियेस आपले सहकार्य मिळावे. पुढील अनेक पिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा निर्णय शाश्वत ठरावा, यासाठी आपण एकजुटीने कार्य करूया."

Ranajagjitsinha Patil :
Phaltan Ramraje Nimbalkar News : शरद पवारांची साथ का सोडली, रामराजेंनी स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com