Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha PatilSarkarnama

Ranajagjitsinha Patil News : आमदार राणा पाटलांच्या तुळजापुरातच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

Tuljapur BJP : तालुकाध्यक्षाची निवड परस्पर केल्याचा खुलासा पक्षातील कार्यकर्त्यांनी केल्यामुळे खळबळ...
Published on

Dharashiv News :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव मतदारसंघातून प्रबळ दावेदारी सांगणाऱ्या भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापुरात हा प्रकार उघडकीस आला आहे. इथे संघटनात्मक पातळीवर भाजपला तडजोडी कराव्या लागत आहेत. (Ranajagjitsinha Patil News)

तालुकाध्यक्षाची निवड परस्पर केल्याचा खुलासा पक्षातील कार्यकर्त्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नवा तालुकाध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी तुळजापूर तालुक्यात भाजपची (BJP) राजकीय परिस्थिती बिकट होती. मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या भाजप प्रवेशामुळे तुळजापूर (Tuljapur) विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा पक्षाला विजयश्री खेचून आणता आली. भाजपाकडे  पदाधिकारी व कार्यकर्ते यांची गर्दी वाढू लागली आहे.

Ranajagjitsinha Patil
MP Omraje Nimbalkar News : मंत्री सावंतांच्या सुरात राष्ट्रवादीच्या बिराजदारांचे सूर; खासदार ओमराजेंना विचारला जाब...

सध्याची परिस्थिती पाहता तालुक्याच्या भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये सर्व आलबेल असल्याचे चित्र होते. पण भाजपच्या तुळजापूर तालुका नूतन कार्यकारिणीच्या निवडीनंतर भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या निवडीनंतर भाजपच्या तालुका अध्यक्षांनी काही तासातच आपल्या लेटरपॅडवर स्कॅन केलेल्या सहीचा वापर करून नवीन कार्यकारिणीची यादी समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा खुलासा दिला. या निवडीवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तालुकाध्यक्षांनी केले आहे. यामुळे कार्यकर्ते ही संभ्रमात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या नूतन कार्यकारिणी निवडीचे तालुकाध्यक्षांच्या सहीनिशी व ज्यांची निवड करण्यात आली आहे, त्यांच्या नावानिशीचे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. यानंतर ज्यांच्या नवीन निवडी झाल्या आहेत, त्यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. मात्र, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी समाजमाध्यमांवर एक पत्र टाकले. त्यांनी खुलासा केला की, तालुका भाजप कार्यकारिणीबाबत नवीन नियुक्त्या झालेल्या नाहीत. तथाकथित निवडीच्या याद्या खोट्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुकाध्यक्षांच्या या पत्रानंतर मात्र एकच खळबळ उडाली आणि निवड यादीतील पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. भारतीय जनता पार्टी हा पक्ष अत्यंत शिस्तीचा म्हणून ओळखला जातो. तुळजापूर येथे झालेल्या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत व बाहेर याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील होणाऱ्या निवडी या तरी पक्षश्रेष्ठी व सर्वानुमते व्हाव्यात, अशा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.

(Edited By – Rajanand More)

Ranajagjitsinha Patil
Parbhani AIMIM News : 'एमआयएम'चे काँग्रेसी सूर ; इम्तियाज जलील यांनी फोडले नव्या वादाला तोंड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com