Dharashiv News : खासदार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपत आला आहे. मागील पाच वर्षाचा लेखाजोखा त्यांना विचारलाच पाहिजे? हीच त्यांना जाब विचारण्याची योग्य वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी निंबाळकर यांना पाच वर्षात खासदार म्हणून तुम्ही काय केले? असा जाब विचारला आहे. (MP Omraje Nimbalkar News)
विशेष म्हणजे काही दिवसापुर्वी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीही निंबाळकर यांना पाच वर्षात जनतेसाठी केंद्रातली आपण एक आणलेली योजना दाखवा, म्हणाल ती पैज हरायला मी तयार आहे, असे आव्हान दिले होते. आता सावंत यांच्या सुरात राष्ट्रवादीच्या बिराजदार यांचेही सूर मिसळल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
जनतेसाठी जे जे शक्य आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न केला. मला सर्वांची मदत मिळणार असून मला जिल्ह्यात विरोधक नाही. एखाद्या पदाच्या माध्यमातून जनसेवेसाठी तुम्ही काय केलं? लोककल्याणासाठी काय केलं? याचा विचार करावा. नुसत्या भुलथापा, आम्ही हे करू ते करू असे सांगून दिशाभूल करू नका, अशी टीकाही बिराजदार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून धाराशिव लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात अशी कोणती कल्याणकारी योजना तुम्ही राबवली हे जनतेला कळू द्या. सर्व सामन्यांना उपयुक्त ठरेल अशी एकही योजना आपण जिल्ह्यासाठी आणलेली माझ्यातरी तरी निदर्शनास येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आधी मतदारांसमोर जाताना मागील पाच वर्षाचा लेखाजोखा तुम्हाला द्यावा लागेल. हे विचारण्याचा अधिकार मला आहे, असेही बिराजदार म्हणाले.
(Edited By – Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.