Jalna BJP News : भावाला महानगरप्रमुख अन् समर्थक आमदाराला जिल्हाध्यक्ष करत जालन्यावर रावसाहेब दानवेंची मजबूत पकड!

Former minister Rao Saheb Danve strengthens his political hold in Jalna as his brother is appointed BJP city chief and a close supporter MLA takes over as district president. : जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे तर परभणी लोकसभा मतदार संघात आमदार बबनराव लोणीकर हे पक्ष विस्ताराचे काम करतात.
Jalna District-City President News
Jalna District-City President NewsSarkarnama
Published on
Updated on

उमेश वाघमारे

Marathwada Political News : संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये जालना जिल्ह्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. महानगरप्रमुख पदावर भास्कर दानवे तर जिल्हाध्यक्षपदी समर्थक आमदार नारायण कूचे यांची वर्णी लावत रावसाहेब यांनी जालन्यात आपलीच 'दादागिरी'चालणार हे दाखवून दिले आहे.

भाजपाने राज्यातील जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने खांदेपालट केला आहे. जिल्ह्यात मात्र, या खांदेपालटमध्ये रावसाहेब दानवे यांचे पारडे जड राहिले. शहर महानगराध्यपदी भास्कर दानवे तर ग्रामीण जिल्हाध्यपदी आमदार नारायण कुचे यांची वर्णी लागली आहे. हे दोन्ही नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे समर्थक असून आमदार बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांना मात्र या संघटनात्मक नियुक्तीत कुठेही स्थान मिळालेले नाही.

जालना जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागलेला आहे. जालना (Jalna) लोकसभा मतदारसंघात बदनापूर, भोकरदन विधानसभा मतदार संघाचा तर परभणी लोकसभा मतदार संघात परतूर, घनसावंगी विधासनसभा मतदार संघाचा समावेश आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे तर परभणी लोकसभा मतदार संघात आमदार बबनराव लोणीकर हे पक्ष विस्ताराचे काम करतात. त्यामुळे भाजपामध्ये अप्रत्यक्षरित्या दोन नेत्यांचे गट सक्रीय आहेत.

Jalna District-City President News
Chandrakant Khaire On Raosaheb Danve : युती असताना माझ्याविरोधात पैसे वाटणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आम्हाला शिकवू नये! मी त्यांचे तोंडही पाहत नाही

अशात मागील बारा वर्षांपासून रावसाहेब दानवे यांच्या समर्थकाकडेच भाजपाचे जिल्हाध्यक्षपदी राहिले आहे. परंतु, या निवडीत आमदार बबनराव लोणीकर यांनी ताकद लावली होती. परंतु, रावसाहेब दानवे समर्थक असलेले बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांची जालना महानगरध्यक्षपदी निवड झाली आहे. परिणामी जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे यांचीच चलती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Jalna District-City President News
Jalna Crime : "त्यांना माज आलाय..." जालना मारहाण अन् व्हायरल व्हिडिओवरून पालकमंत्री पंकजा मुंडेंचा पारा चढला

2014 च्या निवडणुकीनंतर रावसाहेब दानवे भाजपा प्रदेशाध्यक्ष झाले. या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते. तर 2014 पूर्वी आमदार बबनराव लोणीकर जिल्हाध्यक्ष होते. परंतु, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दानवे यांनी रामेश्वर भांदरगे यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. ते 2019 पर्यंत पदावर राहिले. त्यानंतर आमदार संतोष दानवे यांची जिल्हाध्यपदी वर्णी लागली. ते 2022 पर्यंत जिल्हाध्यक्ष राहिले. त्यानंतर बद्री पठाडे हे जिल्हाध्यक्ष झाले, पण ते ही दानवे समर्थक होते. आता पुन्हा आमदार नारायण कुचे हे जिल्हाध्यक्ष झाले असून ते ही दानवे समर्थक आहेत.

Jalna District-City President News
BJP District President News : भाजपाचे मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर! निष्ठावंतांना दिले झुकते माप

जालना महापालिका झाल्यानंतर जालना शहराध्यक्ष अशोक पांगारकर यांची महानगराध्यक्ष म्हणून वर्णी लागली. त्यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आले. त्यानंतर सतीश जाधव यांना महानगराध्यक्ष करण्यात आले. आता भास्कर दानवे यांची महानगराध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या मनपा निवडणुकच्या तोंडावर ही निवड महत्त्वाची मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com