Jalna Crime : "त्यांना माज आलाय..." जालना मारहाण अन् व्हायरल व्हिडिओवरून पालकमंत्री पंकजा मुंडेंचा पारा चढला

Pankaja Munde on Jalna Viral Video : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असतानाच जालन्यातील एका व्यक्तीच्या अंगावर लोखंडी सळईने चटके देऊन त्याला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.
Pankaja Munde on Jalna Crime
Pankaja Munde on Jalna CrimeSarkarnama
Published on
Updated on

Jalna Crime News, 05 Feb : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असतानाच जालन्यातील एका व्यक्तीच्या अंगावर लोखंडी सळईने चटके देऊन त्याला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच या सर्व प्रकरणावर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी भाष्य केलं आहे. एखाद्याला अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना माज आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंनी या मारहाण प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती दिली. त्या म्हणाल्या, "जालन्यातील (Jalna) ज्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली आहे, त्यांची फॅमिली मला भेटायला आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी (Eknath Shinde) आज सभागृहात या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करू आणि त्यांना मकोका लावू असं सांगितलं आहे.

Pankaja Munde on Jalna Crime
Eknath Shinde Decision : अडचणीत सापडलेल्या महायुती सरकारसाठी आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंनी अधिवेशनकाळातच घेतला 'हा' मोठा निर्णय

यापैकी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्यावर देखील गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, अशा अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याचा व्हिडिओ करणाऱ्या लोकांना माज आला आहे, हे अत्यंत चुकीचं असून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल."

नेमकं प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या आनवा गावामध्ये कैलास बोराडे (Kailash Borade) हा एका मंदिरात गेला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून त्याला लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण करण्यात आली.

संतापजनक बाब म्हणजे या घटनेचं व्हिडिओ शूट देखील आरोपींनी केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनू उर्फ भागवत दौड याला अटक केली आहे. दौडचा ठाकरेंच्या शिवसेनेचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड असल्याचं सांगितलं जात आहे.

Pankaja Munde on Jalna Crime
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी संधी साधली; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर केली राष्ट्रवादीची कोंडी ?

या मारहाण प्रकरणी जालन्यातील पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर जखमी कैलास बोराडे याच्याशी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी बोराडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी करू नको, एकनाथ शिंदे तुझ्यासोबत आहे, असं म्हणत कैलास बोराडे यांना धीर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com