Raosaheb Danve Attend marriage ceremony : लग्नसराईची धूम, नेत्यांची धावपळ ; दानवेंनी अंतरपटही धरला..

Jalna : दानवे सध्या मतदारसंघासह मराठवाडा आणि राज्यभरात लग्न सोहळ्यांना हजेरी लावतांना दिसत आहेत.
Raosaheb Danve Attend marriage ceremony News
Raosaheb Danve Attend marriage ceremony NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू आहे, (Raosaheb Danve Attend marriage ceremony ) प्रत्येक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री आपापल्या मतदारसंघातील लग्नांना हजेरी लावण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहे. तर कुणी आपुलकीने पंगती देखील वाढत आहे. दररोज किमान १० ते १५ लग्नांना हजेरी लावावी लागत असल्याने नेत्यांचा चांगलाच घाम निघत आहे.

Raosaheb Danve Attend marriage ceremony News
Kannad APMC Members Meet CM News : कन्नड बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांना मुख्यमंत्र्यांची शाबासकी..

त्यातच वर्षभरावर लोकसभा आणि दीड वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने कुठलेही लग्न चुकू नये याची काळजी नेते मंडळी घेतांना दिसत आहेत. (Jalna) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे मतदारसंघात रमणारे नेते म्हणून ओळखले जातात.

दिवसभर कुठेही असले आणि कितीही उशीर झाला तरी ते मतदारसंघात परत येवून तिथेच मुक्काम करणे पसंत करतात. तर असे हे दानवे सध्या मतदारसंघासह (Marathwada) मराठवाडा आणि राज्यभरात लग्न सोहळ्यांना हजेरी लावतांना दिसत आहेत. मतदारसंघातील लग्न असेल तर मग आधी त्याला प्राधान्य दिले जाते.

बरं लग्नकार्यात गेल्यावर दानवे यांचा मंत्रीपदाचा बाज ते बाजूला ठेवून जणू त्या वधु-वराच्या कुटुंबातलेच एक वाटावे असे मिसळून जातात. वऱ्हाडींबरोबर मांडी घालून बसणे, तर कधी स्टेजवर उभे राहून वधू-वराच्या डोक्यावर अक्षदा टाकतांना दिसतात. आज त्यांनी एका लग्नात चक्क वधू-वराच्या मध्ये अंतरपाट धरल्याचे पहायला मिळाले. दानवे यांच्या या अंतरपट धरण्याने वधु-वरासह वऱ्हाडी मंडळीही खूष झाली.

दोन-पाच मिनिटांच्या भेटीत दानवे उपस्थितांना आपलेसे करून घेतांना दिसत आहेत. आज दानवे यांनी मतदारसंघातील जाफ्राबाद तालुक्यातील रास्तळ येथे होगले व जगताप परिवार, सोनखेडा येथे काकडे व सुरूशे परिवार, जाफ्राबाद येथे भालके व बावस्कर परिवार, हिंदुस्थान लॉन्स जाफ्राबाद येथे कुटुंबरे व महेर परिवार, नळणी खु. येथे वराडे व गाडेकर परिवार, राजूर गणपती येथे सोनवणे व पडोळ परिवार आणि गुरुकृपा मंगल कार्यालय जाफ्राबाद येथे सवडे व सपकाळ परिवाराच्या लग्नाला हेजरी लावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com