Jalna : अक्षदा टाकायला वऱ्हाडी म्हणून आले, अन् दानवेंनी स्टेजवर जाऊन अंतरपाटच धरला..

लोकांमध्ये गप्पा मारत बसलेले दानवे ताडकन उठले आणि स्टेजकडे निघाले. वधु-वरामध्ये धरलेला अंतरपाट त्यांनी आपल्या हातात घेतला. (Raosaheb Danve, Central Minister)
Railway State Minister Raosaheb Danve News
Railway State Minister Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

जालना : मतदरासंघातील नागरिकांच्या सुख, दुःखात सहभागी होऊन त्यांच्याबद्दल आपुलकी, प्रेम दाखवण्यासाठी राजकीय नेते नेहमीच अग्रेसर असतात. (Jalna) या जोरावरच ते वर्षानुवर्ष विजय मिळवून यशाची शिखरं गाठतं असतात. जालना लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आणि सध्या केंद्रात रेल्वे राज्य मंत्री असलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे यापैकीच एक.

मोठ्या पदावर गेलो तरी आपली नाळ ही गावाशी, मतदारसंघातील लोकांशी आणि जनतेशी जोडलेली आहे हे ते नेहमी दाखवत आले आहेत. (Marathwada) मंत्री म्हणून देश आणि विदेशात कुठेही गेले तरी, ते परत आपल्या मतदारसंघात आणि लोकांमध्ये रमलेले अनेकदा आपण पाहतो. पदाधिकारी, कार्यकर्ते सांभाळण्यात देखील त्यांचा हातखंडा आहे.

तर हे सगळं पुन्हा सांगण्याच कारण म्हणजे रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून त्यांच्या मतदारसंघातील लोकांची मने जिंकून घेतली आहे. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांनी तिथे आवर्जून हजेरी लावली. मंत्री आले म्हटल्यावर त्यांचे स्वागत, हारतुरे झाले आणि पदाचा कुठलाही बडेजाव न करता ते सर्वसामान्य वऱ्हांडीप्रमाणे मांडी घालून बसले.

Railway State Minister Raosaheb Danve News
Nanded : अशोक चव्हाण खोटं बोलण्यात नंबर एक, आता राजशिष्टाचार पाळला जाईल..

अक्षदा वाटायला सुरूवात झाली, गुरूजी मंगल अष्टक म्हणायला सुरूवात करण्याआधी वधु-वराच्या मामांना स्टेजवर घेऊन येण्याची विनंती करत होते. तेवढ्यात लोकांमध्ये गप्पा मारत बसलेले दानवे ताडकन उठले आणि स्टेजकडे निघाले. वधु-वरामध्ये धरलेला अंतरपाट त्यांनी आपल्या हातात घेतला आणि गुरूजींना ` करा मंगल अष्टक सुरू`, असा लाडीक आदेशही दिला.

संपुर्ण मंगल अष्टक होऊन वधु-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत नाही तोपर्यंत अंतरपाट धरण्याचे कार्य दानवे यांनी पार पाडले. लग्न लागल्यानंतर वधु-वरांना शुभेच्छा आणि आशिर्वाद घेऊनच ते तिथून बाहेर पडले. दानवे यांच्या या कृतीने उपस्थितांची मने तर जिंकलीच पण आपल्यातल्या साधेपणाचे दर्शन दानवेंनी पुन्हा घडवल्याची चर्चा देखील या निमित्ताने वऱ्हाडी मंडळींमध्ये सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com