Raosaheb Danve News : वंदे भारत... रावसाहेब दानवेंनी घडवली चारशे कार्यकर्त्यांना सुपरफास्ट सफर...

BJP News : आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील एक हजारांवर कार्यकर्त्यांना रेल्वेने दिल्ली वारी घडवून आणली आहे.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सहाव्या 'वंदे भारत' ट्रेनला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करीत दानवेंनी मास्टर स्ट्रोक लगावल्याची चर्चा होत आहे. (Raosaheb Danve News) या पहिल्या वंदे भारत ट्रेनची सफर दानवे यांनी आपल्या मतदारसंघातील चारशेहून अधिक कार्यकर्त्यांना घडवून आणली. 'दादां'चे हे प्रेम पाहून मग कार्यकर्तेही भारावले.

Raosaheb Danve News
Raosaheb Danve News : `वंदे भारत` च्या निमित्ताने रावसाहेब दानवेंच्या सलग सहाव्या विजयाला हिरवा झेंडा ?

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमतात. कधी रस्त्याच्या कडेला बसून हातावर चटणी भाकरी खात ते कार्यकर्त्यांचा आग्रह पूर्ण करतात, तर कधी पायी चालणाऱ्या सामान्य माणसाला गाडीत बसवून त्याच्या गावापर्यंत सोडतात. (BJP) असे अनेक किस्से रावसाहेब दानवे यांच्याबद्दल सांगितले जातात. गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात असलेल्या दानवे यांनी गावचा सरपंच ते केंद्रात राज्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास कार्यकर्त्यांच्या बळावरच यशस्वी केला. त्यामुळे कार्यकर्ता म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे.

राजकीय आयुष्यातला सर्वोच्च क्षणही ते सामान्य कार्यकर्त्यासोबत घालवण्याला प्राधान्य देतात. मग 'वंदे भारत'सारखी ट्रेन मराठवाड्यासारख्या मागसलेल्या भागातून सुरू करताना दानवे कार्यकर्त्यांना कसे विसरतील, (Marathwada) तर जालन्याहून मुंबईकडे निघालेल्या या पहिल्या सुपरफास्ट आणि आलिशान ट्रेनमधून दानवे यांनी चक्क चारशेहून अधिक कार्यकर्त्यांना सफर घडवली. कार्यकर्त्यांसाठी हा सुखद धक्का होता, पण असे धक्के दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेकदा दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 मध्ये दानवे पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर वर्षभरातच ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील एक हजारांवर कार्यकर्त्यांना रेल्वेने दिल्ली वारी घडवून आणली आहे, तर शेकडो कार्यकर्त्यांना हेलिकॉप्टरची सैर करून आणली आहे. प्रदेशाध्यक्ष असताना महाराष्ट्रभर तसेच देशाच्या इतर भागात दानवे प्रचारासाठी फिरायचे. बहुतांश वेळा त्यांना हेलिकॉप्टरने फिरावे लागते.

मग लांबच्या प्रवासात एकटेच जाण्यापेक्षा ते काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जायचे. ग्रामपंचायत सदस्य, गावाचे माजी सरपंच, ज्येष्ठ कार्यकर्ते अशा सगळ्यांना त्यांनी गगनभरारीचा अनुभवही दिला. ज्यांनी हा अनुभव घेतला त्यांच्यासाठी हे सगळे स्वप्नवतच होते. विशेष म्हणजे दानवेंना भोकरदनमध्ये सोडून परत जाणाऱ्या हेलिकाॅप्टरमधून मुंबई, पुण्याची सफरही दानवे यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवली. हेलिकाॅप्टरने जाणाऱ्या कार्यकर्त्यांची परत येण्याची सोयही दानवे पदरमोड करून करायचे.

Raosaheb Danve News
Bjp News : ...तर 'त्या' मंडळींचा पत्ता कट! फडणवीसांनी भरला दम

वर्षभरापूर्वी संभाजीनगरहून मुंबईला जाणारी जनशताब्दी रेल्वे दानवे रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जालन्याहून नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही या रेल्वेच्या पहिल्या प्रवासात दानवे यांनी तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसोबत मुंबईपर्यंतचा प्रवासही केला होता. लोकांसोबत मुंबईपर्यंत प्रवासदेखील केला, पुन्हा या तीनशे लोकांसोबत जालन्यापर्यंत परतीचा प्रवासही केला होता. दानवेंकडून कार्यकर्त्यांची अशी काळजी घेतली जात असल्याने तेही त्यांच्यावर जाम खूश आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Raosaheb Danve News
Jalna Lok Sabha Constituency: सरपंच ते केंद्रात मंत्री; रावसाहेब दानवेंच्या राजकारणाची यशस्वी चार दशके

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com