Raosaheb Danve : संजय राऊत तोंडाने वाया गेले ; ईडी विरोधात कायद्याने लढलं पाहिजे..

अशी अनेक प्रकरण असतांत ज्यामध्ये ईडी किंवा सीबीआयने केलेली कारवाई न्यायालयाने चुकीची ठरवून आरोपींना निर्दोष मुक्तही केले आहे. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News New Dehli
Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News New DehliSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : ईडी सुडबुध्दीने वागतेय, केंद्राकडून विरोधकांवर दबाव आणण्यासाठी तपास यंत्रणाचा वापर केला जातो असे आरोप आणि त्यावर आमच्याकडून अनेकदा स्पष्टीकरण देवून झाले आहे. वारंवार तेच विषय समोर आणले जातात, त्यावर आमचे मत कायम आहे. (ED Action) काॅंग्रेसच्या काळात देखील ईडी, सीबीआयच्या कारवाया झाल्या होत्या.

अमित शहा, मोदी, सुरशे कलमाडी, लालू प्रसाद यादव अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांवर कारवाया झाल्या, त्याला त्यावेळी सगळ्या नेत्यांनी कायद्याने उत्तर दिले. (Sanjay Raut) संजय राऊत मात्र तोंडाने लढा देत आहेत, त्यांनी कायद्याने लढा दिला पाहिजे, असा सल्ला केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिला आहे.

दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी ईडी कारवाईवरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेतांना संजय राऊत यांना टोला लगावला. दानवे म्हणाले, संजय राऊत किंवा त्यांच्या कुटुंबीतील कोणत्या सदस्याला ईडीने चौकशीसाठी बोलावले असले तर त्याला त्यांनी समोर गेले पाहिजे. कायद्याने तुम्हाला कोर्टात दाद मागता येते. पण केवळ राजकीय हेतून केंद्र सरकारवर आरोप करणे एवढेच काम सध्या संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे.

Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News New Dehli
Osmanabad : सेनेकडे चार गावे; राणा जगजितसिंह यांना तुळजापूरमध्ये अपयश!

अशी अनेक प्रकरण असतांत ज्यामध्ये ईडी किंवा सीबीआयने केलेली कारवाई न्यायालयाने चुकीची ठरवून आरोपींना निर्दोष मुक्तही केले आहे. त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी बेछूट आरोप करण्यापेक्षा राऊत आणि त्यांच्या कुटुंबाने व इतर ज्याच्या कुणावर ईडी, सीबीआयची कारवाई झाली असेल, त्यांनी कायद्याने लढावे. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणावंर कोणाताही दबाव नाही, त्या स्वतंत्रपणे काम करत असतात असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ते भाजपचे घरगडी असल्याची टीका केली आहे. यावर दानवे म्हणाले, जाधव हे माझे चांगले मित्र आहेत, पण संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलतांना तारतम्य बाळगले पाहिजे. त्यांच्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे. आम्ही ते नेहमी पाळत आलो आहोत, त्यामुळे जाधवांनी राज्यपालांवर केलेली टीका चुकीची आहे, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com