Raosaheb Danve-Santosh Danve News : कंजूस, नादान म्हणत रंगलेल्या दानवे पिता-पुत्राच्या जुगलबंदीने आणली धमाल!

Raosaheb Danve commented on Santosh Danve, saying he is still immature. The ongoing father-son dialogue is widely discussed. : या दोघांचे स्वभाव, काम करण्याची पद्धत यात बराच फरक आहे. रावसाहेब दानवे हे आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे या क्षेत्रात 'दादा' पण तरुण रक्ताचे 'भाऊ' देखील काही कमी नाहीत.
Raosaheb Danve-Santosh Danve News
Raosaheb Danve-Santosh Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

तुषार पाटील

BJP News : भोकरदन या आपल्या कर्मभूमीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले आजोबा दशरथ बाबा दानवे यांच्या नावाने चॅरिटेबल हाॅस्पीटल सुरु केले. त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी दानवे पिता-पुत्रामध्ये रंगलेल्या जुगलबंदीने उपस्थितांचे चांगेलच मनोरंजन केले. विशेष म्हणजे ज्या जेवणाच्या विषयावरून दानवेंमध्ये चर्चा रंगली होती, ते जेवण काही कार्यक्रमाला आलेल्यांना मिळालेच नाही.

रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे (Santosh Danve) या दोघांचे स्वभाव, काम करण्याची पद्धत यात बराच फरक आहे. रावसाहेब दानवे हे आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे या क्षेत्रात 'दादा' पण तरुण रक्ताचे 'भाऊ' देखील काही कमी नाहीत, हे संतोष दानवे यांनी विजयाची हॅट्रीक करत दाखवून दिले. कार्यकर्त्यांची नस अचूक ओळखण्याची कला रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. तर संतोष दानवे यांचा भर हा बदलत्या काळानूसार कुठलाही कार्यक्रम हा नियोजनबद्ध आणि लक्षात राहील असा झाला पाहिजे यावर असतो.

आता या दोघांमधील स्वभाव आणि काम करण्याच्या पद्धतीतील फरक जाणवणारा रंजक प्रसंग या निमित्ताने घडला. भोकरदन शहरात कार्यक्रम तो ही (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे-संतोष दानवे यांच्या उपस्थितीत म्हटल्यावर सहाजिकच लोकांची गर्दी झाली होती. तसा कार्यक्रमाला उशीर झाल्याने दुपारपर्यंत लोक ताटकळले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष दानवे यांनी हे हेरले. अस्सल मराठवाडी भाषेत "आमचं म्हतारं किती कंजूस आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, असा डायलाॅग तो ही रावसाहेब यांच्यासमोरच संतोष दानवे यांनी मारला आणि सगळेच चकित झाले.

Raosaheb Danve-Santosh Danve News
Raosaheb Danve News : 'रावसाहेब दानवे सिर्फ नाम ही काफी है', माजी म्हणून हिणवणाऱ्या चंद्रकांत दानवेंना टोला!

संतोष दानवे एवढ्यावरच थांबले नाही, एवढं मोठं हॉस्पिटल, मेट्रो शहराप्रमाणे सुविधा असणारी अत्यंत पॉश दिसणारी व एवढी मोठी चांगली बिल्डिंग मीच केली असं तुम्हाला वाटत असेल. मात्र तसे नाही हे सर्व दादांनी केले, अनेक महिन्यांपासून विशेष लक्ष घालून त्यांनी ते पूर्ण करून घेतले आहे. मी नियोजन केले असते तर आजच्या कार्यक्रमात निश्चित सर्वाना जेवण ठेवले असते, असे म्हणताच समोरून जोरदार प्रतिसाद मिळाला.

Raosaheb Danve-Santosh Danve News
MLA Santosh Danve News : कैलास बोराडे व कुटुंबियांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार!

आता पोरानंच भर सभेत कंजूस म्हणून उल्लेख केल्यावर रावसाहेब दानवे शांत बसतील तर ते 'दादा' कसले? अध्यक्षीय भाषणात रावसाहेब दानवे यांनी चारिटेबल हॉस्पिटल सुरू करण्याचे कसे ठरले? त्याचे मालक कोण? याची माहिती दिली अन् मग मूळ मुद्याला हात घातला. संतोष तू अजून नादान आहे. मला राजकारणात भरपूर वर्ष झाली, त्यामुळे कार्यकर्ते कसे सांभाळायचे हे मला चांगलंच माहित आहे, असा टोला लागावला.

Raosaheb Danve-Santosh Danve News
BJP Politics : माजी मुख्यमंत्र्यांनी सत्ता सोडून भाजपमध्ये प्रवेश केला; आता तेल गेले, तूप गेले...

नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था ठेवली असती तर लोक अर्धे उठून गेले असते, या मंडपात भाषण ऐकायला कोणीच नसते. लोक दाबून धरणे ही सुद्धा एक कला आहे, तुला शिकायला अजून लय वेळ लागलं, असे म्हणताच उपस्थितांनी मोठ्या दानवेंनाही दाद दिली. एकूण काय तर संतोष दानवे आपली व्यवस्थीत काळजी घेतात, या विचाराने त्यांचे कार्यकर्ते आणि नागरिक भारावून गेले. पण एवढा मोठा कार्यक्रम होऊनही आता घरच्या भाकरीच खाव्या लागणार, याचा अंदाज येताच मग सगळ्यांनी धूम ठोकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com