Raosaheb Danve: सत्तेत असताना जातनिहाय जनगणनेची मागणी का लावून धरली नाही? दानवेंनी राहुल गांधींसह राऊतांनाही फटकारलं

Caster Cenus : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील लक्ष बाजूला व्हावं यासाठी जनगणना काढली असल्याचा आरोप केला होता.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान चांगलाच अडचणीत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे गुरुवारी (ता.1) जालन्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांना फटकारलं आहे. सत्तेत असताना त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी का लावून धरली नाही? अशी विचारणा करतानाच आमचं सरकार निर्णय घेताना विरोधकांना विचारत नाही,असा चिमटाही त्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) काढला.

दानवे म्हणाले, केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं दानवेंनी स्वागत केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,इंदिरा गांधी यांच्या काळात जातीय जनगणना झाली नाही. सत्तेत असताना जनगणना न करणारे या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Raosaheb Danve
Devendra Fadnavis : देवेंद्रजी, 100 दिवसांसाठी 'पाठ थोपटून' उपयोग नाही... 'राजाने' सरदारांना घेऊन एकदा लोकांमध्येही जाऊन बघावं!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील लक्ष बाजूला व्हावं यासाठी जनगणना काढली असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या वक्तव्यावरूनही दानवे यांनी हल्ला चढवला आहे. संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झाला आहे. राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले,केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं होतं. तसेच या सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबाही जाहीर केला होता. पण याचवेळी त्यांनी सरकारनं घोषणा केलेली जातनिहाय जनगणना कधी होणार,असा सवालही उपस्थित केला होता.

Raosaheb Danve
Nilesh Lanke : ...म्हणून निलेश लंकेंनी अजितदादांच्या आमदारकीवर पाणी सोडत शरद पवारांची राष्ट्रवादी जवळ केली

जातनिहाय जनगणना ही मूळची काँग्रेसची संकल्पना असल्याचं सांगत आम्ही अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी करत आलो असल्याचं सांगितलं होतं.याचवेळी जातनिहाय जनगणनेनंतरच भारताचा खरा विकास सुरू होईल. यासाठी आरक्षणासाठी असलेली 50 टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे असं मतही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com