Raosaheb Danve : तेव्हा आम्ही राजेंचा सन्मान केला, शिवसेना त्यांना बंधनात अडकवत आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे हे राजे आहेत, त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता, हे सांगायला देखील दानवे विसरले नाहीत. (Bjp)
Raosaheb Danve-Sambhajiraje Chhatrapati News,  Raosaheb Danve News, Raosaheb Danve on Shivsena
Raosaheb Danve-Sambhajiraje Chhatrapati News, Raosaheb Danve News, Raosaheb Danve on Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेकडे मदत मागितली होती. पण ती करण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) राजेंना शिवबंधन बांधण्याची अट घालता १२ वाजेपर्यंत मातोश्रीवर या असा निरोप पाठवला होता. राजेंनी ही आॅफर नाकारत सकाळीच मुंबई सोडल्याची माहिती आहे. या विषयावरून आता राजकारण सुरू झाले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Raosaheb Danve News)

संभाजीराजे छत्रपती (Smbhajiraje Chhartapati) यांचा सन्मान करून त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. आता मात्र शिवसेना त्यांना बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेला राजेंबद्दल आदर असेल, खरच त्यांचा सन्मान राखायचा असेल तर त्यांना सुरक्षित जागेवर म्हणजेच संजय राऊत यांच्याऐवजी उमेदवारी दिली पाहिजे, असा सल्ला देखील दानवे यांनी शिवसेनेला दिला आहे.

औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर भाष्य केले. दानवे म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारीसाठी शिवसेनेत येण्याची आॅफर दिल्याच्या बातम्या मी माध्यमांतूनच ऐकल्या. हा राजेंना अडकवण्याचा शिवसेनेचा डाव आहे. मतासांठी राजेंना शिवबंधन बांधण्याची अट म्हणजेच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.

उलट राजेंचा सन्मान राखण्यासाठी शिवसेने त्यांना पक्षाच्या पहिल्या जागेवर राऊत यांच्याऐवजी उमेदवारी द्यायला हवी आणि दुसऱ्या जागेवर राऊतांना. पण शिवसेनेला केवळ राजेना अडकवायचे असल्यामुळे त्यांना दुसऱ्या जागेवर उमेदवारी आणि शिवसेनेत प्रवेशाची अट घातली असावी. आम्ही मात्र तेव्हा राजेंचा योग्य सन्मान राखला होता.

Raosaheb Danve-Sambhajiraje Chhatrapati News,  Raosaheb Danve News, Raosaheb Danve on Shivsena
Imtiaz Jalil : जाती-धर्माच्या नावावर मतदान करणारे औरंगाबादकरही पाणी प्रश्नाला जबाबदार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे हे राजे आहेत, त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता, हे सांगायला देखील दानवे विसरले नाहीत. राज्य सभेच्या सहाव्या जागे संदर्भात भाजपचा अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही, पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com