मुंबई : रस्ता करायचा म्हटलं की अडथळे हटविण्याचं काम प्रशासनाला करावंचं लागतं. पण ते करताना बड्या धेंडांना अभय आणि गरिबांच्या घरावर (House) बुलडोझर चालवला तर ते अन्यायकारक ठरतं. असाच प्रकार जालना (Jalna) जिल्ह्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या गावात घडला आहे. केंद्रीय मंत्री दानवे आणि त्यांच्या भावाचे दोन बंगले अडथळा ठरत असूनही त्यांना अभय देण्यात आले आहे. मात्र, एका गरीब कुंभाराची झोपडी उद्ध्वस्त केली आहे, तीही रात्री. (Discrimination in road construction in Jalna : Raosaheb Danve's house saved but demolished house of poor)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावी एका गरीब कुंभार कुटुंब जे हातावर पोट भरून उदरनिर्वाह करते. या कुटुंबाचे घर रात्री प्रशासनाने रोड करायचा आहे; म्हणून पाडले आहे. या कुटुंबाचा रस्ता करण्यासाठी कसलाही विरोध नाही, त्यांची फक्त एकच अपेक्षा आहे की, महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे आम्हाला आमचा रीतसर मोबदला मिळावा.
याच कुंभार यांच्या घराच्या बाजूला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे बंधू या दोघांचे बंगले आहेत. जे की रस्त्याच्या मूळ अर्ध्यात येतात, पण त्या घरांना प्रशासनाने हात लावल्याचे दिसून येत नाही. रस्ता तयार करायचा आहे, तर त्या रस्त्यात येणारी सर्व घरे नियमाप्रमाणे पाडली पाहिजेत. पण, असं काहीही न होता फक्त सामान्य गरीब कुटुंबाचे घर सत्तेच्या बळावर पाडण्यात आले आहे. या कुटुंबाच्या पाठीशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे, असा विश्वासही शेख यांनी दिला आहे.
त्या कुंभार कुटुंबाला सरकारच्या नियमप्रमाणे योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी त्या कुटुंबाला दिला आहे.
त्या घरातील महिला म्हणाली की, आम्ही घरात झोपलो होतो. रात्री ते लोक आले, त्यांनी आमच्या घरातील बकऱ्या सोडून बाहेर बांधल्या. त्यानंतर ते म्हणाले म्हातारे होती का नाही बाहेर. मी ओरडत होते. त्यातील काहींनी माझ्या दोन्ही मुलांना धरून ठेवले हेाते. सुनांना बाहेर ढकलून दिलं. मलाही रस्त्यावर ढकलून दिलं. त्यांनी माझ्या डोक्याला रायफल लावली. जेसीबीखाली दाबून टाकून अशी धमकी दिली. जीव वाचविण्यासाठी मी पोरांना म्हटलं की आता सोडून द्या. त्यानंतर आमचं घर पाडले. सूचना देऊन दिवसा आमचं घरं पाडलं असतं तर काय वाटलं नसतं. मात्र, झोपेत असताना आम्हाला उठवून घर पाडण्यात आले आहे, असा आरोप त्या वयोवृद्ध महिलेने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.