अभिजित पाटील कोणाचे? : फडणवीसांची विशेष रणनीती; तर राष्ट्रवादीकडून खुद्द पवारांनीच घातले लक्ष!

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अभिजीत पाटील यांचे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात महत्व वाढले आहे.
Sharad Pawar-Abhijit Patil-Devendra Fadnavis
Sharad Pawar-Abhijit Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : साखर कारखान्यांच्या माध्यमातून आपली ताकद वाढविणारे आणि पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) निवडणुकीत मातब्बरांना धूळ चारणारे अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपकडून (BJP) विशेष व्यूव्हरचना आखली जात आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाटील यांना पक्षात घेण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीकडून खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच विशेष लक्ष घातले आहे, त्यामुळे अभिजित पाटील हे पवारांचे होणार की भाजपच्या कळपात सहभागी होणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Battle between NCP and BJP to get Abhijit Patil into the party)

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील जनता हाच माझा पक्ष असल्याचे अभिजीत पाटील यांनी जाहीर आहे. त्यामुळे अभिजीत पाटलांच्या राजकीय भूमिकेकडे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar-Abhijit Patil-Devendra Fadnavis
'शिंदे माझे सासरे..' ; पवारांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, "आता सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं ? "

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अभिजीत पाटील यांचे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात महत्व वाढले आहे. त्यामुळे त्यांना भाजप आणि राष्ट्रवादीने पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. दोन्ही पक्षांकडून आवतण असले तरी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका अजून तरी उघड केलेली नाही.

Sharad Pawar-Abhijit Patil-Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; यशवर्धन कदमबांडे शिवसेनेत!

साखर उद्योगात मोठे नाव असलेले अभिजित पाटील यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी अत्यंत घनिष्ठ राजकीय संबंध आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. पडत्या काळात मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही पाटील यांना मोठी मदत केली आहे. दरेकर यांनी केलेल्या मदतीमुळेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करणे शक्य झाले आहे.

Sharad Pawar-Abhijit Patil-Devendra Fadnavis
आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले पण मंत्रिमंडळ विस्तार कधी ? ; खडसेंचा टोला

अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना निवडणुक निकालानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. कुर्डूवाडी येथे शरद पवार आले असता पाटील यांनी शरद पवारांच्या गाडीत बसून यवतपर्यंत प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर पवारांशी चर्चा झाली होती. तेव्हापासून अभिजीत पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते चार दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याचा गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. त्या कार्यक्रमात अभिजीत पाटील यांचे दरेकर यांनी तोंड भरून कौतुक केले. पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. आम्हाला सोडून ते कुठेही जाणार नाहीत, असा दावा दरेकर यांनी केला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी शिंदे गटात किंवा भाजपमध्ये या असे आवाहन केल्याने अभिजीत पाटलांची भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी पोकळी आहे. ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने अभिजीत पाटलांना गळ घातली आहे, तर दुसरीकडे भाजपनेही ऑफर दिल्याची चर्चा सुरु आहे.

पाटलांची राष्ट्रवादी-भाजपला का गरज?

अभिजीत पाटलांचा राजकीय प्रभाव पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत वाढू लागला आहे. त्यातच राष्ट्रवादी काॅंग्रेसला आगामी विधान परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने अभिजीत पाटलांची अधिक गरज आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे हे दोन्ही नेते सध्या राष्ट्रवादीपासून हात राखून आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पाटील यांना पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघावर वर्चस्व राखण्यासाठी भाजपने अभिजीत पाटील यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

अभिजीत पाटील यांना पक्षात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशेष लक्ष घातल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अभिजीत पाटील कोणाच्या गोटात सहभागी होतात की विठ्ठल परिवार म्हणून स्वतंत्रणे निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com